Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीदेशातील एकूण कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी ५५ टक्के रुग्ण फक्त केरळ, महाराष्ट्रात

देशातील एकूण कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी ५५ टक्के रुग्ण फक्त केरळ, महाराष्ट्रात

केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाची माहिती

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी देशातील कोरोनाच्या स्थितीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी केरळ आणि महाराष्ट्रात सध्या १० हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली. तसेच देशातील एकूण कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी ५५ टक्के रुग्ण या दोन्ही राज्यांमध्ये असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

अग्रवाल म्हणाले, देशात दुसऱ्या डोससाठी लसीकरणात वाढ करण्यात आली आहे. देशभरात लसीकरण वाढावे यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. युरोपमध्ये कोविड केसेसमध्ये वाढ होत असून इथेच जगभरातील ७० टक्के कोरोनाच्या प्रकरणांची नोंद झाली आहे.

या तुलनेत दक्षिणपूर्व आशियामध्ये भारतासह इतर अकरा देशांमध्ये गेल्या आठवड्यात केवळ १.२ लाख कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली. ही संख्या जगातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येच्या ३.१ टक्के आहे. म्हणजेच आशियातील या भागात कोरोनाच्या संसर्गात घट झाली आहे.

युरोपात गेल्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी २.७५ लाख नवे केसेस आणि ३१,००० हून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे, असेही यावेळी लव अग्रवाल यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -