‘गाथा’ उत्सवाच्या निमित्ताने…

Share
  • मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

भाषा व साहित्याची गरज केवळ त्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांना असते, असा गैरसमज असतो. पण कल्पना, विचार, ऊर्जा यांची गरज सर्वांना असते व साहित्यातून ही पुंजी नक्कीच मिळते. आपण उत्सवप्रिय असतो. हे उत्सव साहित्याशी संबंधित असले, तर त्यांना साकार करताना काय नवे करता येईल? खरे तर खूप काही… पण त्याकरिता कल्पकता हवी. असेच कल्पक आयोजन सोमैया विद्याविहार व स्टोरी टेलर्स असोसिएशन यांनी मिळून केले.

हा उत्सव कथाकथनावर आधारित आहे. या उत्सवाचे महत्त्व म्हणजे नावीन्यपूर्ण पद्धतीने केले गेलेले आयोजन. विणकामाच्या कथा, स्वयंपाक घरातील कथा, रागकथा, वादनकथा, पोवाडा व भारुड रूपांतील कथा, लोककथा, कळसूत्री खेळातून कथा अशा विविध कथनरूपांचा समावेश या उत्सवात झाला आहे. या उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कथनकार डाॅन याशिस्की, सीता ब्रांड यांसारखे कथनकार सहभागी झाले. विदेशातही सीता या नावाचे किती आकर्षण आहे. शीळ वाजवणे, विविध प्रकारचे आवाज, त्यांचे चढ-उतार, आरोह-अवरोह, विराम, संवाद या सर्वांचा उपयोग कथनशैलीमध्ये करून समोरच्या प्रेक्षकांना धरून ठेवता येते. संपदा कुलकर्णी-जोगळेकर या मराठी अभिनेत्रीने सादर केलेली ‘आभाळ’ ही स्वरचित कथा प्रभावी होती. हेलन केलर आणि तिच्या शिक्षिकेच्या सुंदर नात्यावर प्रकाश टाकणारी ही कथा मातीत रुजणाऱ्या अंकुरासारखी आश्वासक ठरली. तरुण व ज्येष्ठ असे दोन्ही कथाकार या उद्घाटन सत्रात होते.

नव्या पिढीचे घटस्फोटासारखे निर्णय व त्याकडे पाहण्याचे जुन्या पिढीचे दृष्टिकोन या विषयावरची बंगाली वातावरणातली कथा तरुणांना आवडून गेली. पती-पत्नीच्या नात्याचे कितीतरी कंगोरे विविध भाषांतील कथांमधून व्यक्त झाले आहेत.
आयुष्यातील नि नात्यातील असे हे रंग कथनरूपांमधून साकार होतात. महाभारत, रामायण नि पुराणांमधील कथा आजही आपल्याला भुरळ घालतात. जुन्या गाण्यांमधले एक गीत या दृष्टीने मनोहर आहे.

भरजरी गं पितांबर दिला फाडूनी
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण…
सुभद्रा कृष्णाची पाठची बहीण
विचाराया गेले नारद म्हणोन…

आचार्य अत्रे दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या चित्रपटातील हे गीत कृष्णकथेतील एक सुंदर प्रसंग
कथन करते. ‘प्रेमाचं लक्षण भारी विलक्षण’ हे या गीतातील शब्द या गीताला एका उंचीवर नेऊन ठेवतात. ‘गाथा’ या उत्सवानिमित्ताने कथारूपांचे विविध फेर मनात आकार धरू लागले आहेत. हा उत्सव आज मुंबईकर रसिकांचे आकर्षण ठरतो आहे.

Recent Posts

पंतप्रधान मोदींनी पुन्हा अजित डोवाल यांच्यावर दाखवला विश्वास, तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवताना तिसऱ्यांदा त्यांची…

55 mins ago

Water Crisis : पावसाळ्यातही मराठवाड्यावर जलसंकट!

'या' जिल्ह्यांना अजूनही पाणीटँकरचा पाणीपुरवठा हिंगोली : मागील महिन्यात उन्हाच्या कडाक्यात अनेक गावांना पाणीटंचाईच्या (Water…

3 hours ago

Karan Johar : नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी करण जोहरची न्यायालयात धाव!

नेमकं काय घडलं? मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) याने त्याची…

3 hours ago

Murder Case : खळबळजनक! पोटच्या मुलानेच घेतला जन्मदात्याचा जीव

आधी गळा आवळला.. कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला अन्... वर्धा : आष्टी तालुक्यात वडील मुलाच्या पवित्र…

3 hours ago

एसटी पुन्हा ढाब्यांवर : प्रवाशांची लूट सुरूच!

एसटीच्या अल्पोपहार केंद्रांवर सन्नाटा ; खासगी हॉटेलची मात्र चंगळ एसटी महामंडळाचे अधिकारी व ढाबे मालकांच्या…

4 hours ago

तळीयेतील दरडग्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

तळीयेवर दरडीची टांगती तलवार कायम; २७१ पैकी केवळ ६६ कुटूंबांचे पुनर्वसन महाड : महाड तालुक्यातील…

4 hours ago