Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबई महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालये आणि समितीच्या अध्यक्षांची दालने सील

मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालये आणि समितीच्या अध्यक्षांची दालने सील

शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांचा निर्णय

मुंबई : मुंबई महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहेत. शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांनी निर्णय केला आहे. आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत सर्वच पक्षांची कार्यालये तात्पुरती सील करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालयच नाही तर विविध समितीच्या अध्यक्षांची दालने सुद्धा सील करण्यात आली आहेत.

खासदार राहुल शेवाळे, नरेश म्हस्के, यशवंत जाधव, शीतल म्हात्रे आणि गिरीश धानुरकर यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काल मुंबई महापालिकेत जाऊन शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर आपला हक्क सांगितला. ती बातमी कळताच शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही मुंबई महापालिका गाठली. त्यामुळे सर्वांना बाहेर काढून कार्यालय सील केले. तर आज सकाळी सर्व पक्षांची कार्यालये आणि अध्यक्षांची दालने सील केली.

शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची आधी भेट घेतली. मग त्यांनी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दाखल होण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला आणि घोषणाही दिल्या. त्यानंतर ते कार्यालयात घुसल्याचे समजताच शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे त्यांना आवर घालताना मुंबई पोलिसांची तारांबळ उडाली होती. अखेर बीएमसीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन मुंबई पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेच्या इमारतीबाहेर काढले आणि कार्यालय सील केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -