Saturday, May 4, 2024
Homeदेशनुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्याची निर्घृण हत्या

नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्याची निर्घृण हत्या

उदयपूर (हिं.स.) : राजस्थानातील उदयपूर येथे नुपूर शर्माच्या समर्थात सोशल मिडीयावर स्टेटस ठेवणाऱ्याची आज, मंगळवारी निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर मारेकऱ्यांनी व्हिडीओ जारी करत हत्येची जबाबदारी घेतली. तसेच व्हिडीओमध्ये नुपूर शर्मा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील धमकी दिली आहे.

उदयपूरच्या धनमंडी पोलीस स्टेशन परिसरात मृतक कन्हैयालाल हा टेलरिंगचे दुकान चालवायचा. कपडे शिवण्याच्या बहाण्याने मारेकरी त्याच्या दुकानात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली. तसेच मारेकऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरलही केला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेनंतर उदयपूरमध्ये शेकडो लोक रस्त्यावर उतरले असून, घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी दुकाने बंद ठेवली असून, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. शहर आणि परिसरात अफवा पसरू नये यासाठी उदयपूर जिल्ह्यात इंटरनेट सेवा पुढील २४ तासांसाठी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दरम्यान कन्हय्यालालची हत्या करणाऱ्या जिहादींची ओळख पटली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, उदयपूरमधील घडलेल्या हत्येचा निषेध असून, या घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल आणि पोलीस या घटनेचा पूर्ण तपास करण्यात येईल असे आश्वासन गेहलोत यांनी दिले आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच शांतता राखण्याचे आवाहन गेहलोत यांनी केले आहे. याशिवाय सीएम गेहलोत यांनी जनतेला हत्येचा व्हिडिओ शेअर न करण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, घटनेनंतर उदपूरमध्ये चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे उदयपूरचे एसपी मनोज कुमार यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -