Sunday, May 19, 2024
HomeदेशAyodhya Ram Mandir : राम मंदिराच्या दर्शनासाठी आता हेलिकॉप्टर सेवा!

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या दर्शनासाठी आता हेलिकॉप्टर सेवा!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशात करणार प्रारंभ

अयोध्या : अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा (Ramlalla Pran Pratishtha) अभूतपूर्व सोहळा आता केवळ चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी अयोध्येत भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. वाढणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना हा सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच श्रीरामाच्या दर्शनाची आस लागलेल्या भाविकांसाठी उत्तर प्रदेशचे सरकार (Uttar Pradesh government) हेलिकॉप्टरची सेवा (Helicopter service) सुरू करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हे लखनौहून या सेवेचा प्रारंभ करणार आहेत.

उत्तर प्रदेशमधील सहा जिल्‍ह्यांमधून हेलिकॉप्टरने अयोध्येला जाता येणार आहे. भाविकांना अयोध्यानगरी आणि राम मंदिराच्या हवाई दर्शनाचीही सोय करण्यात येणार आहे. याची जबाबदारी पर्यटन विभागाकडे देण्यात आली आहे. मथुरेतील बरसाना येथील गोवर्धन परिक्रमेजवळ आणि आग्र्यातील आग्रा द्रुतगती मार्गाजवळही हेलिपॅड उभारले आहे. हे अंतर क्रमशः ४५६ आणि ४४० किलोमीटर एवढे आहे.

कसे असेल मंदिराचे हवाई दर्शन?

शरयू नदीच्या किनाऱ्यावरील पर्यटक निवासाजवळ हेलिपॅडची उभारणी करण्यात आली आहे. भाविकांना हेलिकॉप्टरने राममंदिर, हनुमानगढी शरयू घाटा समेत प्रेक्षणीय स्थळांच्या हवाई दर्शनाची सोय असणार आहे. ही हवाई सफर १५ मिनिटांची असेल. हवाई दर्शनासाठी प्रति व्यक्ती ३ हजार ५३९ रुपये भाडे आकारले जाणार आहे. एका वेळी एका हेलिकॉप्टरमध्ये पाच भाविक असतील. भाविक गोरखपूरहूनही उड्डाण करू शकतील. गोरखपूर ते अयोध्या हे १२६ किलोमीटर अंतर आहे. सुमारे ४० मिनिटांच्या सफरीसाठी प्रति व्यक्ती ११ हजार ३२७ रुपये शुल्क असणार आहे.

वाराणसी किंवा लखनौ ते अयोध्याही करता येणार उड्डाण

वाराणसीतील नमो घाटावरून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध केली जाणार आहे. हे सुमारे १६० किमी अंतर असून प्रवासाचा काळ ५५ मिनिटे आहे. यासाठी प्रति व्यक्ती १४ हजार १५९ रुपये तिकीट आकारले जाईल. तसेच लखनौमधील रमाबाई येथून देखील उड्डाण करता येणार आहे. हे १३२ किमी अंतर ४५ मिनिटांत कापले जाईल व त्यासाठी प्रति व्यक्ती १४ हजार १५९ रुपये तिकीट आकारण्यात येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -