Friday, May 17, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2023: फायनलसाठी रिझर्व्ह डे नाही, पावसामुळे सामना रद्द झाल्यास असा...

Asia Cup 2023: फायनलसाठी रिझर्व्ह डे नाही, पावसामुळे सामना रद्द झाल्यास असा ठरणार विजेता

नवी दिल्ली : श्रीलंकेमध्ये खेळवल्या जात असेल्या आशिया चषकातील (asia cup) सामने हे पावसामुळेच अधिक चर्चेत राहिले. असा कोणताच सामना झाला नाही ज्यात पावसाने खोडा घातला नाही. यातच आशिया चषकाच्या फायनलबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

आशियाई क्रिकेट कौन्सिलकडून स्पष्ट करण्यात आले आहे की फायनलसाठी कोणताही रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसामुळे फायनलचा सामना पूर्ण झाला नाही तर दोन्ही संघाना विजयी घोषित करून ट्रॉफी शेअर केली जाईल.

आशिया चषकातील फायनलचा सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. रिझर्व्ह डे नसल्याने मान्सूनमध्ये श्रीलंकेत या सामन्यांचे आयोजन केल्याबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आधीच पावसामुळे खूप नुकसान झाल्याचे म्हटले आहे. पीसीबीचे म्हणणे आहे की, ते पावसाच्या मौसमामुळे ते श्रीलंकेऐवजी यूएईमध्ये सामन्यांचे आयोजन करायचे होते मात्र एसीसीचे अध्यक्ष जय शाहने यूएईच्या ऐवजी श्रीलंकेचा पर्याय निवडला.

कुठून सुरू झाला वाद?

या वादाची सुरूवात आशिया चषकाच्या यजमानपदाबाबत सुरू झाली होती. या वर्षी आशिया चषकाचे यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानकडे होता. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये संघाला पाठवण्यास नकार दिला. यानंतर यजमानपदासाठी अधिक पर्याय शोधण्याची सुरूवात झाली. अखेर यजमानपदासाठी हायब्रिड मॉडेल ठरवण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -