Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीकोणी कितीही पावसात भिजले, तरी त्याचा परिणाम होईल असे नाही

कोणी कितीही पावसात भिजले, तरी त्याचा परिणाम होईल असे नाही

गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांना खोचक टोला

मुंबई : राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची आज निवडणूक होत आहे. दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की, भाजपच्या हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच सत्ताधारी आणि विरोधी नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज कुणीही पावसात भिजले तरी निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असे म्हणत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला.

पडळकर यांनी आज सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते मतदानानंतर विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलत होते. कोणी कितीही पावसात भिजले, तरी त्याचा परिणाम होईल असे आज वाटत नाही. भारतीय जनता पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आहे. २०१९ ला राज्यातील जनतेने भाजप-सेना युतीचे १६१ आमदार निवडून दिले होते. पण, विश्वासघात झाला. पाठीत खंजीर खुपसून यांनी सरकार स्थापन केले. पण, आता आमदारांना आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे, अस पडळकर म्हणाले.

अपक्ष आमदारांची मविआने अनेकदा अब्रू घालवली. ते लोकांमधून निवडून आले आहेत. त्यांच्या विश्वासार्हतेवर यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. लोकांमध्ये या आमदारांविषयी मत कलुषित करण्याचा प्रयत्न झाला आहे. ते सर्व आमदार आजच्या दिवशी मतदानातून नक्कीच व्यक्त होतील,” असंही पडळकरांनी नमूद केले.

भाजपाचे काही आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, १७० आमदार असणाऱ्यांची बैठक पहाटे संपल्याचे माध्यमातून ऐकले. भाजपाची बैठक रात्री साडेआठ वाजताच संपली. १७० आमदारांवाले पहाटेपर्यंत कशासाठी जागे आहेत? म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येत आहे की त्यांच्यात काहीतरी गोंधळ उडाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -