Sunday, May 19, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : उबाठा ही शरद पवारांनी थुंकलेली सुपारी

Nitesh Rane : उबाठा ही शरद पवारांनी थुंकलेली सुपारी

संजय राऊत अर्बन नक्सलवाद्यांचा चेहरा 

भाजप आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) गंजलेल्या आणि गांजलेल्या विषयावर भाष्य केले आहे. जर तुम्ही भाजपला गंजलेला बांबू बोलण्याची हिंमत करत असाल तर मग तुमची उबाठा (Ubatha) ही पवारांनी (Sharad Pawar) थुंकलेली सुपारी असा उल्लेख करायचा का? असा जोरदार हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर भाष्य करणाऱ्या आदित्य ठाकरेंनाही (Aditya Thackeray) खडे बोल सुनावले.

नितेश राणे म्हणाले, आजकाल काँग्रेसला काहीही बोललं की संजय राऊतला लगेच मिरच्या झोंबतात. जेवढ्या काँग्रेसच्या लोकांना लागत नाहीत तेवढ्या लाल आणि हिरव्या मिरच्या संजय राऊतच्या बुडाखाली लागतात, त्यामुळे तो सामना हे ‘काँग्रेस’चं जे नवं मुखपत्र आहे त्यातून बडबडायला लागतो. माननीय मोदीजी यांनी जे भाषण केलं ते वस्तुस्थितीला धरुन आहे, पण जेवढं काँग्रेसला हे भाषण झोंबलं नाही तेवढं या नवीन गांधीटोपी घातलेल्या संजय राजाराम राऊतला झोंबलं. पण तुमच्या उबाठाची अवस्था ही पवारांनी थुकलेल्या सुपारीसारखी झालेली आहे. सगळीकडे त्याचे शिंतोडे उडालेले आहेत, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.

अर्बन नक्सल आणि संजय राऊतांचा जवळचा संबंध

काल आदरणीय मोदीजींनी अर्बन नक्सलचा उल्लेख केला. तर संजय राऊत अर्बन नक्सलांचा प्रवक्ता झाला आहे का, हेच कळत नाही. मी गेल्या काही महिन्यांअगोदरही संशय व्यक्त केला होता की संजय राऊत आणि अर्बन नक्सलांमध्ये नेमके काय संबंध आहेत? त्यांच्यासारखेच गुण राऊतमध्ये जाणवतात त्यामुळे हा संशय वाढत चालला आहे. कारण मोदीजींनी जी अर्बन नक्सल आणि काँग्रेसची वस्तुस्थिती मांडली तर लगेच संजय राऊतला एवढी आग लागण्याची काय गरज आहे? त्यामुळे त्यांचे खरंच संबंध आहेत का याचा तपास करण्याची वेळ आली आहे, अशी विनंती मी केंद्र आणि राज्य सरकारला करणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.

आदित्य ठाकरेच्या ट्विटमुळे एक माशी मरत नाही

आज सकाळच्या प्रेसमध्ये राऊतने मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर भाष्य केले आहे. म्हणे आदित्य ठाकरेंच्या एका ट्विटमुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला. आदित्य ठाकरेच्या ट्विटमुळे एक माशी मरत नाही, तो ट्विट करायला इतका घाबरतो की कोणीही त्याला टीकात्मक प्रश्न विचारले की थेट त्याला ब्लॉक केलं जातं. मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती, दुष्काळजन्य परिस्थिती पाहून दौरा रद्द केला. याला संवेदनशीलता म्हणतात, राज्यावर असलेलं प्रेम म्हणतात. पण तुमचा मालक जेव्हा मानेच्या ऑपरेशनसाठी जसलोक रुग्णालयात अॅडमिट होता तेव्हा तुमच्या मालकाचा मुलगा परदेश दौरे करत होता.

असा घाणेरडा आणि विकृत पुत्र, नातू कुठल्याही घरी येऊ नये

त्याच्याही पुढे जेव्हा दाओस दौऱ्याच्या नावाखाली आदित्य ठाकरे बाहेरगावी फिरत होता तेव्हा आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी होती. त्या १७ नोव्हेंबरच्या दिवशीदेखील आदित्य ठाकरेने आपला परदेश दौरा रद्द करुन महाराष्ट्रात यायचा विचार केला नाही. स्वतःचे वडील आजारी असताना मी मुख्यमंत्री कसा बनेन याचे घाणेरडे मनसुबे आदित्य ठाकरे रचत होता. अशी पोलखोल नितेश राणे यांनी केली. आदित्यसारखा घाणेरडा आणि विकृत पुत्र, नातू कुठल्याही घरी येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना करेन असंही नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -