Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणघुमडाई देवीचे निलेश राणेंनी घेतले दर्शन

घुमडाई देवीचे निलेश राणेंनी घेतले दर्शन

ग्रामस्थांनी केला सत्कार

मालवण (वार्ताहर) : मालवण तालुक्यात डोंगर कुशीत वसलेल्या निसर्गसंपन्न घुमडे गावातील श्री देवी घुमडाई मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व जीर्णोद्धार दिनाचा ११वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.

‘निलेश राणे मालवण कुडाळ मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने आमदार होऊ दे’, असे गाऱ्हाणे उपस्थित गावकऱ्यांनी देवी चरणी घातले. निलेश राणे यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

यावेळी प्रदीप बिरमोळे, महादेव बिरमोळे, सुरेश बिरमोळे, विष्णू बिरमोळे यांसह भाजप जि. सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाऊ सामंत, घुमडे सरपंच दिलीप बिरमोळे, उपसरपंच राजेश सावंत, अमोल केळुसकर, उमेश बिरमोळे, उद्योजक मोहन राणे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आबा हडकर, राकेश सावंत, बाळू राणे, सूर्यकांत बिरमोळे आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -