Sunday, May 19, 2024
HomeदेशWrestling Federation of India : कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह निलंबित

Wrestling Federation of India : कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह निलंबित

अध्यक्षांसह संपूर्ण संघावर केली निलंबनाची कारवाई

नवी दिल्ली : बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) आणि कुस्तीपटू (Wrestlers) यांच्यात सुरु असलेल्या वादादरम्यान केंद्र सरकारने (Central Government) मोठी कारवाई केली आहे. नुकतीच कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेले बृजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह (Sanjay Singh) यांच्यावर निलंबनाची (Supsension) कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच भारतीय कुस्ती महासंघालाही केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने निलंबित केले आहे.

क्रीडा मंत्रालयाचे म्हणणे आहे की कुस्ती महासंघाने विद्यमान नियमांकडे दुर्लक्ष केले आहे. अधिकृत प्रसिद्धीपत्रकात, क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा घाईघाईने करण्यात आली आणि नियमांचे पालन केले गेले नाही. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे ही स्पर्धा आयोजित केली जाणार होती, जो बृजभूषण सिंह यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे नव्याने नियुक्त कुस्ती महासंघाची मान्यताच रद्द करण्यात आली आहे.

जवळपास वर्षभराने कुस्ती महासंघाची निवडणूक झाली होती. त्यात बृजभूषण सिंह यांच्या दबदबा पाहायला मिळाला. महत्त्वाच्या पदावर त्यांच्याच माणसांची नियुक्ती झाली होती. मात्र, घाईत घेतलेले काही निर्णय संघाला महागात पडले आहेत. क्रीडा मंत्रालयाने कुस्ती संघाला निलंबित करताना संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांनाही स्थगिती दिली आहे. पुढील आदेशापर्यंत कुठलीही कारवाई करण्यालाही स्थगिती देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -