Home देश आदित्यनाथ मुख्यमंत्री होताच कत्तलखान्यांची कत्तल

आदित्यनाथ मुख्यमंत्री होताच कत्तलखान्यांची कत्तल

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील १ तर गाजियाबादमधील १५ अवैध कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली- मुख्यमंत्रीपदाची धुरा उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी सांभाळताच राज्यातील कत्तलाखान्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली असून अलाहाबादपाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील १ तर गाजियाबादमधील १५ अवैध कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत.

वाराणसीच्या जैतपुरा भागातील एका अवैध कत्तलखान्याला कुलूप लावण्यात आले आहे. तर गाजियाबादच्या विविध भागांमधील जवळपास १५ कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी शपथ घेतल्यानंतरच्या अवघ्या २४ तासांमध्ये अवैध कत्तलखान्यांवर कारवाई सुरू झाली आहे.

अलाहाबादमधील दोन कत्तलखाने सोमवारी सील करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने अटाला अवुरीमधील चकदोंदी परिसरात असणारा एक आणि रामबाग अवुरी भागात असणारा एक, असे अलाहाबादमधील दोन कत्तलखाने बंद करण्यात आले आहेत. जवळपास २५० कत्तलखाने उत्तर प्रदेशात आहेत.

भाजपाकडून उत्तर प्रदेशातील जनतेला निवडणूक प्रचारादरम्यान सत्ता येताच उत्तर प्रदेशातील कत्तलखाने बंद करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. उत्तर प्रदेशात सत्ता येताच भाजपाने अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दररोज हजारो प्राण्यांची कत्तल उत्तर प्रदेशातील २५० कत्तलखान्यांमध्ये केली जाते.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील अनेक कत्तलखाने कागदोपत्री बंद आहेत. मात्र प्रत्यक्षात त्या कत्तलाखान्यांमध्ये प्राण्यांची सर्रास कत्तल केली जाते. महापालिका आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन हा सारा अवैध उद्योग केला जातो. मात्र योगी आदित्यनाथ सत्तेत येताच कत्तलखान्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version