Home देश आता फेसबुकवरून करा मतदार नोंदणी

आता फेसबुकवरून करा मतदार नोंदणी

0

भारतीयांना निवडणूक आयोगामध्ये सहजरीत्या नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी फेसबुकवर रजिस्टर नाऊ हे बटन डिझाईन करण्यात आले आहे.

मुंबई- फेसबुकवर आता १८० दशलक्षहून अधिक भारतीय असून त्यांना भारतीय निवडणूक आयोगामध्ये सहजरीत्या नोंदणी करता यावी यासाठी फेसबुकवर रजिस्टर नाऊ हे बटन डिझाईन करण्यात आले आहे. भारतीयांना निवडणूक आयोगामध्ये सहजरीत्या नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा यामागील उद्देश आहे.

१ ते ४ जुलै दरम्यान मतदानास पात्र असलेल्या लोकांच्या फेसबुकवर वोटर रजिस्ट्रेशन रिमाइंडर पाठविण्यात येणार आहे. हे रिमाइंडर १३ भारतीय भाषांमध्ये पाठविले जाणार असून त्यामध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तमीळ, तेलगु, मल्याळम, कन्नड, पंजाबी, बंगाली, उर्दू, आसामी आणि ओरिया या भाषांचा समावेश आहे.

भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झदी म्हणाले की, मला सांगताना आनंद होत आहे की, भारतीय निवडणूक आयोगाने नोंदणी न केलेल्या मतदारांसाठी एक विशेष उपक्रम सादर केला आहे. कोणताही मतदार मागे राहू नये यासाठी पहिल्यांदाच मतदान करणा-या नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून १ जुलै २०१७ रोजी फेसबुक त्यांच्या संपूर्ण भारतातील वापरकर्त्यांसाठी विविध भारतीय भाषांमध्ये वोटर रजिस्ट्रेशन रिमाइंडर सुरू करणार आहेत.

भारताचे सार्वजनिक धोरण संचालक अनखी दास म्हणाले की, लोक फेसबुकचा वापर शिकण्यासाठी, बोलण्यासाठी, जे विषय त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांवर व्यक्त होण्यासाठी करतात. अशा नागरी भागीदारीला साहाय्य करणारी उत्पादने आम्हाला मतदानाच्या दिवशी व दररोज आम्हाला निर्माण करायची आहेत. जास्त लोकांचा सहभाग असेल तर लोकशाही जास्त ताकदवान असते, असे आम्हाला वाटते. म्हणूनच आम्ही जे लोक मतदानास करण्यास पात्र आहेत त्यांना नोंदणीसाठी प्रोत्साहन देत आहोत. रजिस्टर नाऊ या बटनावर क्लिक करताच नॅशनल वोटर्स सर्व्हिसेस पोर्टल हे पेज ओपन होऊन लोकांना नोंदणीची प्रक्रिया व त्याबद्दलचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version