Home टॉप स्टोरी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

0

निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम गुरूवारी जाहीर करण्यात आला.

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १८ जुलैपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून आवश्यकता भासल्यास ५ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची कारकिर्द १० ऑगस्ट रोजी संपणार आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. आवश्यकता भासल्यास ५ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाईल, असे झैदी यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून रामनाथ कोविंद तर काँग्रेसप्रणित यूपीएकडून मीरा कुमार रिंगणात आहे. आता उपराष्ट्रपतीसाठी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version