Home देश उत्तर प्रदेश विधानसभा : अंतिम टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

उत्तर प्रदेश विधानसभा : अंतिम टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

0

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली.

लखनऊ- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. या शेवटच्या टप्प्यात सात जिल्ह्यांमधील ४० जागांचा समावेश असून ८ मार्च रोजी येथे मतदान होणार आहे.

या सात जिल्ह्यांमध्ये सोनेभद्रा, मिर्झापूर, चंदौली या तीन नक्षलग्रस्त जिल्ह्यांसह गाझीपूर, जौनपूर, भदोई, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचा समावेश आहे.

१६ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून १७ रोजी छाननी, तर २० फेब्रुवारीपर्यंत माघार घेता येणार असल्याचे उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिका-यांनी सांगितले आहे. यानंतर ११ मार्च रोजी सर्व ४०३ जागांची एकत्रित मतमोजणी होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version