Home देश ‘बोल्टला ९ सुवर्णपदके, कारण तो बीफ खातो’

‘बोल्टला ९ सुवर्णपदके, कारण तो बीफ खातो’

0

गोरक्षणाच्या कायम बाजूने असलेल्या भाजपाला सोमवारी त्यांच्याच खासदाराने घरचा अहेर दिला. 

नवी दिल्ली- गोरक्षणाच्या कायम बाजूने असलेल्या भाजपाला सोमवारी त्यांच्याच खासदाराने घरचा अहेर दिला. जागतिक अ‍ॅथलिट उसैन बोल्ट हा ‘बीफ’ खात असल्यानेच त्याने यंदाच्या ऑलिंपिकमध्ये ९ सुवर्णपदके मिळवली, अशी मुफ्ताफळे भाजपाचे खासदार उदित राज यांनी उधळली.

ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना राज म्हणाले की, उसैन बोल्ट हा जमैकात गरीब कुटुंबात जन्माला आला. त्याच्या प्रशिक्षकाने त्याला दिवसातून दोन वेळा बीफ खाण्याचा सल्ला दिला. आता त्याने ऑलिंपिकमध्ये नऊ पदके जिंकली.

‘बीफ’ हा भाजपाच्या दृष्टीने भावनिक मुद्दा आहे. भाजपाच्या अनेक राज्यांनी त्याच्या व्यापारावर बंदी घातली आहे. त्यामुळे उदित राज यांच्या विधानावर गदारोळ झाला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version