Home देश रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत सहा रूग्णांचा मृत्यू

रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत सहा रूग्णांचा मृत्यू

0

लखनऊ येथील किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये भीषण आग लागली असून यामध्ये सहाजणांचा मृत्यू झाला.

लखनऊ- लखनऊ येथील किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये भीषण आग लागली असून यामध्ये सहाजणांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमुळे ट्रॉमा सेंटरचे मोठे नुकसान झाले आहे.

ट्रॉमा सेंटरच्या सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र गंभीर झालेल्या सहाजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

रुग्णालयातील औषधे ठेवण्याच्या स्टोअरमध्ये ही आग लागली होती. आगीनंतर १५० जणांना दुस-या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र रुग्णालय प्रशासनाने कोणतिही मदत केली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दोन तासानंतर अगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण रूग्णालयात धूर पसरला होता. ज्यामुळे लोकांना श्वास घेण्यात अडचण होत होती.

या ठिकाणी उपलब्ध असलेली आग विझवण्याचे उपकरणेही काम करत नव्हती. त्यामुळे खूप मोठी अडचण निर्माण झाली होती. याप्रकरणी रूग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोपही रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

या प्रकरणाची चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version