Home महामुंबई पेब किल्ल्यावरून दोन ट्रेकर दरीत कोसळले

पेब किल्ल्यावरून दोन ट्रेकर दरीत कोसळले

0

रायगड जिल्ह्यातील नेरळजवळ पेब किल्ल्यावरून दोन ट्रेकर दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

रायगड- पावसाळ्यात अनेक तरुण-तरुणी ट्रेकिंगला जातात.मात्र हे ट्रेकिंग जिवाववर बेतण्याची शक्यता असते. रायगड जिल्ह्यातील नेरळजवळ पेब किल्ल्यावरून दोन ट्रेकर दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

दरीत कोसळलेल्या दोघांपैकी एकाला बाहेर काढण्यात यश आले आहे तर दुस-याचा शोध सुरू आहे.

मुंबईजवळ असलेल्या नेरळमध्ये पावसाळ्यात वीकेण्डसाठी पर्यटकांची पहिली पसंती असते. ट्रेकिंगसाठी अनेक तरुण-तरुणी नेरळमधील डोंगरमाथ्याकडे वळतात. त्यामुळे पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

नेरळजवळ असलेल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या काही ट्रेकरपैंकी दोनजण दरीत कोसळले. नेरळ आणि खोपोली परिसरातील ट्रेकर्सच्या मदतीने पोलीस दरीत कोसळलेल्या ट्रेकरचा शोध घेत आहेत. निसर्गाच्या सुंदरतेचा अनुभव घेण्याची उत्सुकता असली तरी अशा दुर्घटना होणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version