Home टॉप स्टोरी अन वाहतूक पोलिसांनी दंडाऐवजी बांधल्या राख्या!

अन वाहतूक पोलिसांनी दंडाऐवजी बांधल्या राख्या!

0

वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनचालकांकडून दंडाची पावती न फाडता राखी बांधून महिला पोलिसांनी आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे केले.

नवी मुंबई- भावाने बहिणीचे रक्षण करावे हा रक्षाबंधन सणाचा उद्देश आहे. याचे निमित्त साधून वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनचालकांना राखी बांधून नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी महिला पोलिसांनी आवाहन केले.

रक्षाबंधन निमित्त पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाच्या खालील सिग्नल जवळ वाहतुकीचे उल्लंघन करणा-यांना महिला पोलीस शिपाई रजनी पाळंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला वाहतूक पोलिसांनी राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले.

वाहतुकीचे नियम बेधडकपणे मोडून पुढे जाणे ही बाब आपण नेहमी बघतो. पोलिसांनी पकडल्यानंतर ‘तोडपाणी’ करणे किंवा त्यांच्याशी हुज्जत घातली जाते. आपण कसे चूक नाही, हेही पटविण्याचा प्रयत्न करणे नित्याचे आहे. मात्र पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने रविवारी राखी पौर्णिमेचे औचित्य साधत अशा प्रकारे नियम मोडणा-या चालकांना कोणतीही शिक्षा न करता, दंडाची पावती न फाडता, अशा चालकांना प्रेमाने राखी बांधून त्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version