Home देश गोव्यात नागा चैतन्य समंथाचा झाला विवाह!

गोव्यात नागा चैतन्य समंथाचा झाला विवाह!

0

टॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी चैसम म्हणजेच नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू हे शुक्रवारी संध्याकाळी लग्नाच्या बेडीत अडकले. गेल्या दोन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या या लव्ह बर्ड्सने हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केले.

पणजी- टॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी चैसम म्हणजेच नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू हे शुक्रवारी संध्याकाळी लग्नाच्या बेडीत अडकले. गेल्या दोन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या या लव्ह बर्ड्सने हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न केले. या विवाहसोहळ्याला दोघांचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्रमंडळी उपस्थित राहिले आहेत.

गोव्यातील डब्ल्यू रिसॉर्टमध्ये समंथा आणि नागा चैतन्यच्या बिग फॅट वेडिंगचे आयोजन करण्यात आले आहे. नागा चैतन्यचे वडील आणि तेलगुतील सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी यांनी आपल्या लाडक्या मुलाच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, लग्नात समंथाने नेसलेली साडी तिच्यासाठी खूप खास आहे. कारण, ही साडी प्रसिद्ध निर्माते डी. रामानायडू यांची पत्नी डी. राजेश्वरी म्हणजेच नागा चैतन्यच्या आजीची आहे. या साडीला डिझायनर क्रेशा बजाजने हलकासा टच दिला आहे.

या विवाहसोहळ्याला डग्गुबती कुटुंब, व्यंकटेश, सुरेश बाबू यांनीही उपस्थिती लावली. तर इतर सेलिब्रिटी पाहुण्यांमध्ये अभिनेता राहुल रवींद्रन, वेन्नेला किशोर, सुशांत आणि अदिवी सेश यांचा समावेश आहे. हिंदू विवाहपद्धतीनुसार शुक्रवारी लग्न झाल्यानंतर या जोडप्याने शनिवारी ख्रिश्चन रीतिरिवाजानुसार लग्न केले. रविवारी हैदराबाद येथे या नवदाम्पत्याच्या आलिशान रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, या दोघांचा विवाहसोहळा गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडला. सुपरस्टार नागार्जुन याने स्वत:चा मुलगा आणि सुनेचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या चाहत्यांना याबाबतची आनंदाची बातमी दिली. दरम्यान, या दोघांची पहिली भेट २००९ मध्ये ये माया चेसाव या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. समंथाचा हा पहिलाच चित्रपट होता. लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्याअगोदर समंथा रूथ आणि नागा चैतन्य तब्बल सात वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले.

[EPSB]

सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या संभाव्य यादीत समावेश आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version