Home महामुंबई ठाणे ठाण्यातील युवासेनेच्या अत्याचारी तरुणापासून शिवसेनेने हात झटकले

ठाण्यातील युवासेनेच्या अत्याचारी तरुणापासून शिवसेनेने हात झटकले

0

ठाण्याच्या किसननगर भागात साडेचार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजी धाडवे (२४) हा युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती.

ठाणे- ठाण्याच्या किसननगर भागात साडेचार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजी धाडवे (२४) हा युवा सेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती.

मात्र हा तरूण आमचा नाहीच म्हणत शिवसेनेने हात झटकले आहेत. प्रत्यक्षात त्याचे शिवसेना नेत्यांबरोबरचे फोटो,बॅनर सोशल मिडियावर फिरत आहेत. या संतापजनक प्रकाराच्या विरोधात काँग्रेसने पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढत याला भरचौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा मतदारसंघात असलेल्या किसननगर भागात सोमवारी सायंकाळी ही घटना घडल्यानंतर तेथे तणावाचे वातावरण आहे. या नराधमाला स्थानिकांनी सोमवारी सायंकाळी पोलीस ठाण्याच्या आवारातच बेदम चोप दिला होता.

शिवाजी धाडवे हा या भागातला युवासेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. शिवाय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बॅनरवरही त्याचे फोटो आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यात स्त्री दाक्षिण्याचे दाखले द्यायचे आणि दुसरीकडे लहान मुलींनाही सोडायचे नाही, हे ‘सैनिकांचे’ धंदे समोर आल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

त्यामुळे बुधवारी सकाळी काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे, प्रदेश सचिव बाळकृष्ण पूर्णेकर, ‘स्वाभिमान’चे शहर संघटक विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वात श्रीनगर पोलीस ठाण्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. यावेळी दुकाने बंद करत त्यांनाही याविरोधात मोर्चात सामील होण्याचे आवाहन काँग्रेसने केले. हा मोर्चा श्रीनगर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांना काँग्रेसने आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

‘तो’ आमचा नाहीच!

या प्रकारानंतर बुधवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने एक निवेदन सोशल मीडियावर फिरवण्यात आले. यात आरोपी शिवाजी धाडवे याचा युवा सेनेशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तर पोलिसांनीही शिवाजीचा सेनेशी संबंध असल्याची पुष्टी केलेली नाही. त्यामुळे सत्तेचा वापर करून सेनेने पोलिसांनाही गप्प केले आहे का? अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version