Home महामुंबई एसटी स्थानकांवरील स्वस्त औषधांची योजना गुंडाळणार?

एसटी स्थानकांवरील स्वस्त औषधांची योजना गुंडाळणार?

0

सर्वसामान्यांना स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी एसटी बस स्थानकांवर स्वस्त औषधांची दुकाने (जेनेरिक औषधे) सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आणि डिसेंबर २०१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात एका सामंजस्य करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.


मुंबई- सर्वसामान्यांना स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी एसटी बस स्थानकांवर स्वस्त औषधांची दुकाने (जेनेरिक औषधे) सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आणि डिसेंबर २०१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात एका सामंजस्य करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या. त्यानंतर औषधांची दुकाने सुरू करण्यासाठी एसटीने निविदा काढली. परंतु निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा त्याला मुदतवाढ देण्यात आली. एकाकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने एसटी महामंडळाचे स्वस्त औषधाची दुकाने सुरू करण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्र सरकारने गरजू रुग्णांना स्वस्त औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी जेनेरिक औषधांची संकल्पना आणली आहे. त्याला अनेक राज्यांतून प्रतिसाद मिळत असतानाच महाराष्ट्रात मात्र स्वस्त औषधे उपलब्ध करणारी दुकाने फारच कमी आहेत.

त्यामुळे एसटीच्या ५९७ बस स्थानकांत स्वस्त औषधांची दुकाने सुरू करण्याची संकल्पना पुढे आली आणि त्याबाबतचा धोरणात्मक निर्णयही एसटी महामंडळाने घेतला. या निर्णयानुसार जेनेरिक औषधे बाजारातील ब्रॅण्डेड औषधांपेक्षा साधारण ४० टक्के कमी दराने विकली जातात. त्यामुळे एसटी स्थानकात स्वस्त औषधांची दुकाने सुरू करून राज्यातील सर्वसामान्य गरजू रुग्णांना विशेषकरून ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने स्वस्त औषधांची दुकाने सर्व एसटी बस स्थानकांवर सुरू करण्यात येत असल्याची माहिती त्या वेळी एसटी महामंडळाकडून देण्यात आली. यामुळे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत बस स्थानकांवर स्वस्त औषधांच्या विक्रीला परवानगी देणारे एसटी महामंडळ हे देशांतील पहिले महामंडळ असल्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले होते. परंतु आठ महिने उलटूनही देशातील पहिले महामंडळ म्हणून दावा करणा-या एसटी महामंडळाकडून स्वस्त औषधांची दुकाने सुरू करण्यात आलेली नाहीत.

[EPSB]

मुंबई – गेल्या दीड वर्षांपासून मृत्यूशी दोन हात करणा-या नवी मुंबईतील चार वर्षांची चिमुकली आराध्याला अखेर हृदय मिळालं आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version