Home महाराष्ट्र नवरात्रीमुळे सोन्याच्या मागणीत वाढ

नवरात्रीमुळे सोन्याच्या मागणीत वाढ

0

नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी यामुळे काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या सराफी बाजाराला मागणीची झळाळी येऊ लागली आहे.

पुणे- नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी यामुळे काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या सराफी बाजाराला मागणीची झळाळी येऊ लागली आहे. नवरात्रीनिमित्त सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झाली असून, दसरा आणि दिवाळीपर्यंत त्यात आणखी वाढ होईल, असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.

वास्तूपाल रांका म्हणाले, उत्सवामुळे काही प्रमाणात लग्नासाठी दागिने खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. गेला काही काळ सराफी बाजारात असलेली मरगळ निघून गेली आहे. मंगळसूत्र, टेम्पल ज्वेलरी, सोनसाखळी खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. मंगळसूत्रातील पेंडंट हि-याचे बनविण्याकडे देखील कल वाढत आहे. चांदीची देवाची मूर्ती, निरंजन, लक्ष्मीची प्रतिमा यांना चांगली मागणी आहे. उत्सवकाळात भेट देण्यासाठी देखील या वस्तूंची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होते.

[EPSB]

ट्रक-कार अपघातात दोघांचा मृत्यू

सोलापूर येथे ट्रक आणि स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी आहेत.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version