Home क्रीडा साक्षी, सिंधू, दीपा, जितूला ‘खेलरत्न’ पुरस्कार

साक्षी, सिंधू, दीपा, जितूला ‘खेलरत्न’ पुरस्कार

0

देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांची सोमवारी घोषणा करण्यात आली असून चार जणांना ‘खेलरत्न’ पुरस्कार, १५ खेळाडूंना ‘अर्जुन‘ पुरस्कार, ६ जणांना द्रोणाचार्य तर तिघांना ध्यानचंद पुरस्कार देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली- देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कारांची सोमवारी क्रीडा मंत्रालयाने घोषणा केली. यात पहिल्यांदाच एकाचवेळी चार जणांना ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

रिओ ऑलिंपिकमध्ये चमकदार कामगिरी करणा-या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांच्यासह जितू राय या चार जणांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, हॉकीपटू व्ही. आर. रघुनाथ, कुस्तीपटू विनेश फोगट यांच्यासह १५ खेळाडूंना ‘अर्जुन‘ पुरस्कार जाहीर झाला आहे. २९ ऑगस्ट रोजी क्रीडादिनानिमित्त राष्ट्रपती भवनात प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते खेळाडूंचा ‘खेलरत्न’ आणि अर्जुन पुरस्काराने सन्मान होणार आहे.

‘खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ पुरस्कार समितीने जिम्नॅस्ट दीपा कर्माकर व नेमबाज जीतू राय यांच्या नावाची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली आहे.

त्यात आता भारताच्या कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू या दोन महिला खेळाडूंनी रियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून इतिहास घडवला आहे. म्हणूनच या दोघांबरोबरच साक्षी आणि सिंधू यांनाही देशातील ‘खेलरत्न’ या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणा-या वर्षात एकापेक्षा जास्त खेळाडूंना ‘खेलरत्न’ पुरस्कार देण्याची तरतूद शासनाच्या एका विशेष नियमात करण्यात आली आहे. दीपा कर्माकर आणि जीतू राय यांची या पुरस्कारासाठी आधीच शिफारस झालेली असून साक्षी आणि सिंधूचे नावही या यादीत जोडले आहे.

यापूर्वी २००९ मध्ये कुस्तीपटू सुशील कुमार, बॉक्सर विजेंदर सिंग आणि मेरी कोम या तिघांचा एकाच वेळी ‘खेलरत्न’ पुरस्काराने गौरव झालेला आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन)
दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक्स)
जितू राय (नेमबाजी)
साक्षी मलिक (कुस्ती)

द्रोणाचार्य पुरस्कार 

नागापुरी रमेश (ऍथलेटिक्स)
सागर दयाल (मुष्टियुद्ध)
राजकुमार शर्मा (क्रिकेट)
बिश्वेश्वर नंदी (जिम्नॅस्टिक्स)
प्रदीप कुमार (जलतरण)
महावीरसिंह (कुस्ती)

अर्जुन पुरस्कार

अजिंक्‍य रहाणे (क्रिकेट)
ललिता बाबर (ऍथलेटिक्‍स)
शिवा थापा (मुष्टियुद्ध)
अपूर्वी चंडेला (नेमबाजी)
रजत चौहान (तिरंदाजी)
सौरव कोठारी (बिलियर्डस)
सुब्रत पॉल (फुटबॉल)
राणी (हॉकी)
व्ही. आर. रघुनाथ (हॉकी)
गुरप्रितसिंग (नेमबाजी)
सौम्यजित घोष (टेबल टेनिस)
विनेश फोगट (कुस्ती)
अमित कुमार (कुस्ती)
संदीपसिंग मान (पॅरा-ऍथलेटिक्स)
वीरेंद्रसिंह (कुस्ती)

ध्यानचंद पुरस्कार

गीता सत्ती (ऍथलेटिक्स)
सिल्व्हानस डुंग डुंग (हॉकी)
राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version