Home महामुंबई महापालिकेतील ‘पहारेकरी’ भाजपाचा शिवसेनेला पहिला धक्का

महापालिकेतील ‘पहारेकरी’ भाजपाचा शिवसेनेला पहिला धक्का

0

मुंबई महापालिका निवडणुकीपासून सुरु झालेला शिवसेना-भाजपा वाद अजुनही शमलेला नाही. शिवसेनेवर कुरघोडी करायची संधी भाजपाकडून सोडली जात नाही. 

मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीपासून सुरु झालेला शिवसेना-भाजपा वाद अजुनही शमलेला नाही. शिवसेनेवर कुरघोडी करायची संधी भाजपाकडून सोडली जात नाही. अशात स्थायी समितीमध्ये पहिल्यादाच शिवसेना आणि भाजपा आमनेसामने आल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले.

पालिकेच्या शिक्षण विभागासाठी सागवान टेबल आणि खूर्ची खरेदी करण्याचा सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला भाजपासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपाने जोरदार विरोध केला. एवढेच नव्हे तर भाजपाच्या प्रस्ताव रेकॉर्ड उपसुचनेला बहुमताने मंजुरी मिळाली. पालिकेत पहारेकरीची भूमिका घेतलेल्या भाजपाकडून शिवसेनेला हा पहिला धक्का दिल्याचे बोलले जाते.

महापालिकेतील शिवसेनेच्या दशकामध्ये पहिल्यादाच शिवसेनेची इच्छा असूनही बहुमत नसल्यामुळे हा प्रस्ताव पास झाला नाही. भाजपच्या सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा गेल्याने प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची सेनेवर नामुष्की ओढावली.

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला ८४ आणि भाजपला ८२ जागा मिळाल्या. कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे अखेर भाजपाने माघार घेतली आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली. या निवडणुकीतून माघार घेतली असली तरी भाजपाने कोणतेही पद स्वीकारले नाही.

मुंबई महापालिकेत आम्ही पहारेक-याची भूमिका पार पाडू असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. ती भूमिक घेत भाजपाने शिवसेनेच्या शिक्षण विभागातील प्रस्तावाला विरोध केला. शिक्षण विभागासाठी सागवान टेबल आणि खूर्ची खरेदी करण्याचा सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादी,सपाच्या मदतीने रोखून धरला. त्यामुळे प्रस्ताव रोखण्याची नामुष्की सेनेवर आली. अशाप्रकारे पहारेकरी भूमिकेत अनेक अपारदर्शक कामांना लगाम घालण्याचा चंग भाजपाने बांधला आहे. पालिका शिक्षण विभागाचा प्रस्ताव रोखणे हा भाजपाचा सेनेला दिलेला पहिला धक्का आहे. त्यामुळे येणा-या काळात अशा अनेक बाबींवर सेना-भाजपा समोरासमोर येण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version