Home महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील ५ पंचायत समित्यांवर शिवसेनेची सत्ता

रायगड जिल्ह्यातील ५ पंचायत समित्यांवर शिवसेनेची सत्ता

0

रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समित्या सभापती उपसभापतीपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने ५ पंचायत समित्यांवर सत्ता मिळवली.

अलिबाग- रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समित्या सभापती उपसभापतीपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने ५ पंचायत समित्यांवर सत्ता मिळवली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५ व शेकापचे ४ सभापती निवडून आले. भाजपा व कॉंग्रेसचा एकही सभापती निवडून आला नाही. मुरुड, सुधागड व उरण या तीन पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड ईश्वर चिठ्ठीने करण्यात आली.

माणगाव, मुरूड , महाड , श्रीवर्धन आणि कर्जत या ५ पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकला. रोहा, म्हसळा, खालापूर, सुधागड व तळा या पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सभापती विराजमान झाले. अलिबाग, उरण , पनवेल , पेण ४ पंचायत समित्यांवर शेकापचा लाल बावटा फडकला आहे. पनवेल व पोलादपूर या दोन तालुका पंचायत समित्यांमध्ये कॉंग्रेसचे उपसभापती निवडून आले आहेत.

पोलादपूर पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव होते. परंतु या प्रवर्गाच उमेदवारच नसल्यामुळे पोलादपूर पंचायत समितीचे सभापतीपद रिक्त राहिले आहे. कॉंग्रेसचे उपसभापती शैलेश सलागरे हे प्रभारी सभापती म्हणून काम पाहतील.

मुरुड, सुधागड व उरण या तीन पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड ईश्वरचिठ्ठीने करण्यात आली. सुधागडमध्ये राष्ट्रवादीच्या साक्षी दिघे तर मुरूडमध्ये शिवसेनेच्या नीता घाटवळ या ईश्वर चिठ्ठीवर सभापती झाल्या. उरणमध्ये शेकापचे नरेश घरत यांना ईश्वरचिठ्ठीने सभापती पदाची लॉटरी लागली.

उरण : सभापती – नरेश घरत (शेकाप)
उपसभापती – वैशाली पाटील (शेकाप)
पनवेल :सभापती – कविता पाटील (शेकाप)
उपसभापती – वसंत काढावळे (काँ)
अलिबाग :सभापती – प्रिया पेढवी (शेकाप)
उपसभापती – प्रकाश पाटील (शेकाप)
मुरूड :सभापती – निता घाटवळ (सेना)
उपसभापती – प्रणिता पाटील (काँ)
कर्जत: सभापती – अमर मिसाळ (सेना)
उपसभापती – सुषमा ठाकरे (सेना)
खालापूर : सभापती – श्रद्धा साखरे (राष्ट्र आघाडी)
उपसभापती – विश्वनाथ पाटील
पाली :सभापती – साक्षी दिघे (राष्ट्रवादी)
उपसभापती – उज्वला देसाई (सेना)
रोहा : सभापती – मिना चितळकर (राष्ट्रवादी)
उपसभापती – विजया पाशीलकर (राष्ट्रवादी)
माणगाव : सभापती – महेंद्र तेटगुरे (सेना)
उपसभापती – माधवी समेळ (सेना)
महाड :सभापती – सिताराम कदम (सेना)
उपसभापती – शुएब पाचकर (सेना)
श्रीवर्धन : सभापती – सुप्रिया गोवारी (सेना)
उपसभापती – बाबूराव चोरगे (सेना)
तळा : सभापती – रविंद्र नटे (राष्ट्रवादी)
उपसभापती – गणेश वाघमारे (राष्ट्रवादी)
पोलादपूर : सभापती – आरक्षित उमेदवार नाही
उपसभापती – शैलेश सलागरे (काँग्रेस)
म्हसळा : सभापती – उज्वला सावंत (राष्ट्रवादी)
उपसभापती – माधवी गायकर (राष्ट्रवादी)
पेण : सभापती – स्मिता पेणकर (शेकाप)
उपसभापती – तैलेश पाटील (शेकाप)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version