Home महामुंबई नाराज शिवसैनिकांची कृष्णकुंजसमोर घोषणाबाजी

नाराज शिवसैनिकांची कृष्णकुंजसमोर घोषणाबाजी

0

दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत मवाळ शब्दांत भाषण केल्यानंतर ख-या शिवसैनिकाला शिवसेनाप्रमुखांच्या बुलंद तोफेची आठवण झाली.

मुंबई- दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत मवाळ शब्दांत भाषण केल्यानंतर ख-या शिवसैनिकाला शिवसेनाप्रमुखांच्या बुलंद तोफेची आठवण झाली. या मेळाव्यातून हताश शिवसैनिक बाहेर पडल्यानंतर त्यांना राज ठाकरे कृष्णकुंज इमारतीत असलेल्या एका काचेतून काहीतरी लिहीत असल्याचे दिसले. त्यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांना ‘राजसाहेब बाहेर या’ अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी शिवाजी पार्कचा परिसर दणाणून सोडला. दसरा मेळाव्यावरून परतणा-या शिवसैनिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानासमोर केलेल्या या घोषणाबाजीच्या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

शिवाजी पार्कमधील दसरा मेळावा अटोपल्यानंतर शिवसैनिकांचा एक जत्था घरी परतत होता. यावेळी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानासमोरून जात असताना त्यांना राज ठाकरे दिसले. त्यावेळी राज ठाकरे आपल्या घरातील तळमजल्यावर काचेच्या खोलीत काहीतरी लिहीत किंवा रेखाटत होते. काचेच्या खोलीतून राज ठाकरे स्पष्ट दिसत असल्याने बाहेरून जाणारे शिवसैनिक थबकलेच. त्यांनी ‘राजसाहेब बाहेर या’ अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. तसंच कृष्णकुंजच्या बाहेर तैनात असलेल्या पोलिसांना न जुमानता तरुण शिवसैनिक राज ठाकरे यांना बाहेर येण्यास सांगू लागले.

शिवसैनिकांच्या आग्रहाखातर राज ठाकरेंनी सुरुवातीला त्यांना आतूनच अभिवादन केलं. पण एवढय़ावरच शिवसैनिक थांबले नाहीत. त्यांचा आग्रह पाहता अखेर राज ठाकरे बाहेर आले. शिवसैनिकांशी हस्तांदोलन करत राज यांनी त्यांना दस-याच्या शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांनी थेट केलेले हस्तांदोलन आणि त्यांच्या स्मितहास्यामुळे शिवसैनिक भारावून गेले.

[EPSB]

दस-यालाच उद्धव ठाकरेंचा शिमगा!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील मेळावा म्हणजे विचारांचे सोने लुटण्याची संधी शिवसैनिकांना मिळत होती. उद्धव ठाकरेंकडे विचारच नाहीत.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version