Home महामुंबई कर्जमाफीची रक्कम द्या; अन्यथा आंदोलन

कर्जमाफीची रक्कम द्या; अन्यथा आंदोलन

0

राज्यभरात कर्जमाफीसाठी ४२ लाख शेतक-यांनी ऑनलाइन अर्ज भरले असतील तर आता सरकार कशाची वाट पाहत आहे.

मुंबई- राज्यभरात कर्जमाफीसाठी ४२ लाख शेतक-यांनी ऑनलाइन अर्ज भरले असतील तर आता सरकार कशाची वाट पाहत आहे. ज्या शेतक-यांनी अर्ज भरले आहेत, त्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करा, असे आवाहन करत, १ ऑक्टोबपर्यंत सरकारने जाहीर केलेल्या सर्व शेतक-यांना कर्जमाफीची रक्कम मिळाली नाही तर राष्ट्रवादी राज्यव्यापी आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला. राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ऑनलाइन अर्जापैकी किती शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत, त्यांची संख्या सरकारने तातडीने जाहीर करावी. सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा करून आता शेतक-यांना रांगेत उभे राहून ऑनलाइन अर्ज भरण्याची केलेली सक्ती म्हणजे वेळकाढूपणा असल्याची टीका तटकरे यांनी केली. ते म्हणाले की, हे सरकार पूर्णत: सत्तेत मशगूल झाले असून, सरकारचे ना मुंबईकडे लक्ष आहे, ना अडचणीत असलेल्या शेतक-यांकडे, ना राज्यातील गणेश भक्तांकडे. या सरकारने घोषणा तर भरमसाठ केल्या; मात्र कृतीमध्ये कोणतीच गोष्ट आणली नाही.

[EPSB]

देशहितासाठी कठोर निर्णय घ्यायला घाबरत नाही : मोदी

आम्ही ‘न्यू इंडिया’ घडवत असून देशहितासाठी कठोर निर्णय घ्यायला घाबरत नाही.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version