Home देश पंतप्रधानांनी जनतेसमोर येण्याची वेळ – शत्रुघ्न सिन्हा

पंतप्रधानांनी जनतेसमोर येण्याची वेळ – शत्रुघ्न सिन्हा

0

यशवंत सिन्हा आणि अरुण जेटली यांच्यातील शाब्दिक युद्ध अजूनही सुरूच आहे. सिन्हा यांनी देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर लेख लिहून सरकारवर केलेली टीका भाजपला चांगलीच जिव्हारी लागली.
नवी दिल्ली- यशवंत सिन्हा आणि अरुण जेटली यांच्यातील शाब्दिक युद्ध अजूनही सुरूच आहे. सिन्हा यांनी देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर लेख लिहून सरकारवर केलेली टीका भाजपला चांगलीच जिव्हारी लागली. अर्थमंत्री अरुण जेटली, सिन्हा यांचे सुपुत्र जयंत सिन्हा व मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनी सरकारची बाजू मांडली. पण सिन्हा यांनाही पाठिंबा देणा-यांची संख्या वाढते आहे. काँग्रेसने सिन्हांचे समर्थन केलेच. पण भाजपचेच नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही सिन्हांची बाजू घेतली. सिन्हांच्या समर्थनात शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जनतेसमोर येण्याचा सल्ला दिला आहे. हीच योग्य वेळ आहे देशातील जनता आणि माध्यमांसमोर जाऊन प्रश्नांची उत्तर द्यायची, असे त्यांनी म्हटले आहे.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीवर यशवंत सिन्हांनी मांडलेल्या मताचे मी आणि इतर विचारवंत नेत्यांनी आधीच समर्थन केले आहे. आमच्या पक्षाचे आणि बाहेरील लोकही त्यांच्याबरोबर आहेत. परंतु, हा मुद्दा यशवंत सिन्हा आणि सरकार अथवा यशवंत सिन्हा आणि जेटली यांच्यापुरताच मर्यादित ठेवू नये. पण सध्या तसाच प्रयत्न केला जातोय. जगजित सिंह यांच्या शब्दांत सांगायचंच तर ‘बात निकलेगी

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ स्थानकाला जोडणा-या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version