Home महामुंबई ठाणे सरकारकडून शेतक-यांची क्रूर थट्टा

सरकारकडून शेतक-यांची क्रूर थट्टा

0

मागील सहा महिन्यांपासून ‘मुंबई-नागपूर एक्स्प्रेस’वे प्रकल्पाला स्थानिक शेतक-यांचा असलेला विरोध डावलून भाजपा-शिवसेनेच्या युती सरकारने दोन दिवसांपूर्वी या मार्गाच्या कामाबाबत काही वृत्तपत्रांतून अधिसूचना जाहीर केली आहे.

शहापूर- मागील सहा महिन्यांपासून ‘मुंबई-नागपूर एक्स्प्रेस’वे प्रकल्पाला स्थानिक शेतक-यांचा असलेला विरोध डावलून भाजपा-शिवसेनेच्या युती सरकारने दोन दिवसांपूर्वी या मार्गाच्या कामाबाबत काही वृत्तपत्रांतून अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे सरकार शेतक-यांच्या शेतजमिनी ताब्यात घेणार असल्याचे स्पष्ट झाले असून संघर्ष समितीने सुचवलेल्या पयार्याचाही विचार झाला नसल्याची चर्चा या भागात आहे.

भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील, शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, स्थानिक संघर्ष समितीचे पदाधिकारी हे गेल्या सहा महिन्यांपासून या ‘एक्स्प्रेस वे’ला विरोध करीत आहेत.

मध्यंतरी शहापुरात झालेल्या कुणबी महोत्सवाला हजर असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतक-यांना विश्वासात घेतल्याशिवाय या एक्स्प्रेसवेचे कोणतेही काम सुरु करणार नसल्याची घोषणा केली होती. परंतु असे असताना सुद्धा तालुक्यातून जाणा-या एक्स्प्रेसवेच्या जमिनीची छुप्या पद्धतीने मोजणी खासगी ठेकेदारातर्फे सुरू असल्याचे एका प्रकरणात उघड झाले होते. त्यावेळेस शांतपणे विचारणा करण्यासाठी गेलेल्या संघर्ष समितीच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल करून अटक देखील करण्यात आली होती.

नागपूर-मुंबई शीघ्रसंचार दुतगती महामार्ग, ठाणे व उपविभागीय अधिकारी, भिवंडी यांच्या कार्यालयामार्फत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र महामार्ग अधिनियमाच्या कलम १९ फच्या पोट कलम (२) अन्वये या नागपूर – मुंबई शीघ्रसंचार दुतगती महामागार्चे बांधकाम करण्यासाठी क्षेत्र निश्चित केले आहे. त्यामुळे शेतक-यांध्ये भीती पसरली आहे.

ज्या शेतक-यांच्या जमिनी या महामार्गात बाधित होत आहेत त्यांना अधिसूचना जाहीर झाल्यापासून पुढील पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये सक्षम प्राधिकरणाकडे लेखी स्वरूपात हरकत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या तक्रारीची पुढील ३० दिवसांत सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे .

या अधिसूचनेमध्ये शहापूर तालुक्यातील रास, वाशाला, हिव, रातधंळे, सरलांबे, सापगांव, शेई, शेरे, खुटघर, चांदे, अंदाड, बिरवाडी, ढाकणे, अर्जुनली, अंबर्जे, गोलभन, कसारा ( बु ), खर्डी, खुटाडी, लाहे, शिरोळ, धामणी, शेलवली, दळखण गावांमधील सर्वे क्रमांक व क्षेत्र घोषीत केले आहेत. यापूर्वी संघर्ष समितीने हा महामार्ग तानसा अभयारण्य परिसरातून नेण्याचा पर्याय सुचविला होता. परंतु त्या पयार्याचा विचार देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांनी केला नसल्याचे अधिसूचनेतून स्पष्ट झाले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version