Home महाराष्ट्र १३ गावांच्या सरपंचपदासाठी ३४ उमेदवार रिंगणात

१३ गावांच्या सरपंचपदासाठी ३४ उमेदवार रिंगणात

0

तालुक्यातील १३ ग्रामंचायतींकरिता वैध ठरलेली नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदाच्या १४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
मंडणगड- तालुक्यातील १३ ग्रामंचायतींकरिता वैध ठरलेली नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदाच्या १४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सरपंचपदाचे ३४ उमेदवार निवडणूक िरगणात शिल्लक राहिले आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी वैध ठरलेल्या २०५ उमेदवारांपैकी ३६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता १६९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. ४ ऑक्टोबरच्या निवडणूक अर्ज छाननीत सरपंचपदाचे २ तर सदस्यपदाचे ८ अर्ज बाद झाले होते.

लोकरवण ग्रा.पं.मध्ये सरपंचपदाचे ५ अर्ज भरण्यात आले होते. यातील ३ अर्ज मागे घेण्यात आल्याने केवळ २ अर्ज शिल्लक राहिले आहेत. या ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी भरलेल्या १३ अर्जापैकी २ अर्ज मागे घेण्यात आले आहेत. ७ सदस्यांच्या अडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी थेट लढत होणार आहे. सदस्यांच्या निवडीसाठी १५ अर्ज भरण्यात आले होते. यातील ३ अर्ज मागे घेण्यात आले आहेत. ७ सदस्यांच्या शिगवण ग्रा.पं.मध्ये सरपंचपदाकरिता भरलेल्या ४ अर्जापैकी १ अर्ज मागे घेण्यात आला आहे. सदस्यांच्या निवडीसाठी १३ अर्ज भरण्यात आले होते. यातील केवळ १ अर्ज मागे घेण्यात आल्याने १२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. ९ सदस्यांच्या देव्हारे ग्रा.पं.मध्ये सरपंच पदाकरिता ४ अर्ज भरण्यात आले होते. यातील १ अर्ज मागे घेण्यात आला आहे.

सदस्यपदाकरिता २८ अर्ज भरण्यात आले होते. यातील ८ अर्ज मागे घेण्यात आले आहेत. ९ सदस्यांच्या वेसवी ग्रा.पं.मध्ये सरपंचपदाकरिता भरलेल्या ६ अर्जापैकी १ अर्ज मागे घेण्यात आला. सदस्यपदाकरिता २५ अर्ज भरण्यात आले होते. यातील ३ अर्ज मागे घेण्यात आल्याने २२ उमेदवार रिंगणात आहेत. ९ सदस्यांच्या बाणकोट ग्रा.पं.मध्ये सरपंचपदासाठी ३ अर्ज भरण्यात आले होते. यातील १ अर्ज मागे घेण्यात आला. सदस्यपदासाठी २८ अर्ज भरण्यात आले होते. यातील ८ अर्ज मागे घेण्यात आले आहेत. ७ सदस्यांच्या दहागाव ग्रा.पं.मध्ये सरपंच पदाकरिता ७ अर्ज भरण्यात आले होते. यातील ३ अर्ज मागे घेण्यात आले आहेत. येथे ७ सदस्यांकरिता १२ अर्ज भरण्यात आले होते. यातील ३ अर्ज मागे घेण्यात आले आहेत. ७ सदस्यांच्या दुधेरे बामणघर ग्रा.पं.मध्ये सरपंचपदाची थेट लढत होणार आहे सदस्यपदाकरिता भरलेल्या ९ अर्जापैकी १ अर्ज मागे घेण्यात आला आहे. ७ सदस्यांच्या कुंबळे ग्रा.पं.मध्ये सरपंच पदाकरिता ३ अर्ज भरण्यात आले होते.

यातील १ अर्ज मागे घेण्यात आला आहे. सदस्यपदासाठी १५ अर्ज भरण्यात आले होते. यातील २ अर्ज मागे घेण्यात आले आहेत. ७ सदस्यांच्या पिंपळोली ग्रा.पं.मध्ये सरपंच पदाकरिता ४ तर सदस्यपदाकरिता १३ अर्ज भरण्यात आले होते. येथे कोणीही माघार घेतलेली नाही. ९ सदस्यांच्या तिडे-तळेघर ग्रा.पं.मध्ये सरंपच पदासाठी ४ अर्ज भरण्यात आले होते. यातील १ अर्ज मागे घेण्यात आला आहे तर सदस्यपदासाठी २१ अर्ज भरण्यात आले होते. यातील ४ अर्ज मागे घेण्यात आले आहेत. ७ सदस्यांच्या विन्हे ग्रा.पं.मध्ये सरपंचपदासाठी भरलेल्या ३ तर सदस्यपदासाठी भरलेल्या १३ अर्जापैकी प्रत्येकी १ अर्ज मागे घेण्यात आला आहे. ७ सदस्यांच्या मुरादपूर ग्रा.पं.मध्ये सरपंचपदाकरिता ३ अर्ज भरण्यात आले होते.

[EPSB]

अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांनी यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावला आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version