Home महाराष्ट्र जिल्ह्यातील ९० सरपंच, ६१ ग्रामपंचायती अविरोध

जिल्ह्यातील ९० सरपंच, ६१ ग्रामपंचायती अविरोध

0

जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायतींपैकी ६१ ग्रामपंचायती सरपंचासह बिनविरोध झाल्या असून २९ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.

रत्नागिरी- जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायतींपैकी ६१ ग्रामपंचायती सरपंचासह बिनविरोध झाल्या असून २९ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्ह्यात थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत एकूण ९० सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्ह्यामध्ये येत्या १६ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. मात्र नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यानंतर अनेक ग्रामपंचायतींसह, सरपंचपदे, सदस्यपदे काही ठिकाणी बिनविरोध झाली आहेत.

जिल्ह्यात २१५ ग्रा.पं.च्या ६६५ प्रभागांमध्ये निवडणूक होणार आहे. मात्र त्यातील ६१ ग्रामपंचायती सर्व सदस्य सरपंचासह बिनविरोध झाल्या आहेत. तर २९ ठिकाणी फक्त सरपंचपदे बिनविरोध निवडून आली आहेत. तर जिल्ह्यातील २३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये दापोलीमध्ये ३० ग्रामपंचायतींच्या ९३ प्रभागांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यातील १२ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत, तर विविध ग्रामपंचायतींमधील ५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

खेड तालुक्यात १० ग्रामपंचायतींमधील ३२ प्रभागांमध्ये निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये १ ग्रा.पं. पूर्णत: बिनविरोध झाली आहे. गुहागर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या ६५ प्रभागांमध्ये निवडणूक जाहीर झाली असून त्यातील ६ ग्रा.पं. पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. ७ ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले असून सदस्यपदांसाठी तेथे निवडणूक होणार आहे. तर २ सदस्य बिनविरोध झाले असून तेथे सरपंचपदासह अन्य सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.

चिपळूण तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींमधील ९६ प्रभागांमध्ये निवडणूक आहे. त्यापैकी १३ ग्रामपंचायती सरपंचपदासह पूर्णत: बिनविरोध निवडून आल्या आहेत. ४ ग्रा.पं.मध्ये सरपंचपदे बिनविरोध झाली आहेत. तर २ सदस्य बिनविरोध झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या ११० प्रभागांमध्ये निवडणुका असून त्यापैकी १४ ग्रा.पं. पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत, २ ग्रा.पं.ची सरपंचपदे बिनविरोध झाली आहेत, तर १ सदस्य बिनविरोध झाला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या ९३ प्रभागांमध्ये निवडणूक आहे. त्यातील ७ ग्रा.पं. पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. तर ९ ग्रा.पं.ची सरपंचपदे बिनविरोध झाली आहेत. ८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. लांजा तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या ५७ प्रभागात निवडणुका आहेत. त्यातील २ ग्रा.पं. बिनविरोध झाल्या आहेत, एक सरपंचपद बिनविरोध झाले आहे तर २ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

[EPSB]

परप्रांतीय हटावचा नारा देत मनसे कार्यकर्त्यांनी सांगली, मिरज भागातील परप्रांतीय कामगारांना भर रस्त्यात चोप दिला.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version