Home देश वाह्यात साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाची नोटीस

वाह्यात साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाची नोटीस

0

देशातील लोकसंख्या वाढीला मुस्लीम जबाबदार असल्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजपा खासदार साक्षी महाराज यांना मंगळवारी निवडणूक आयोगाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

नवी दिल्ली- देशातील लोकसंख्या वाढीला मुस्लीम जबाबदार असल्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजपा खासदार साक्षी महाराज यांना मंगळवारी निवडणूक आयोगाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या वादग्रस्त विधानावरून तुमच्याविरोधात का कारवाई करू नये, असा सवाल निवडणूक आयोगाने केला आहे.

देशातील लोकसंख्या वाढीला मुस्लीमच जबाबदार असल्याचा अप्रत्यक्ष दावा साक्षी महाराज यांनी केला होता. प्रथमदर्शनी पाच राज्यांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वादग्रस्त वक्तव्य आचारसंहितेचा भंग होते. या वक्तव्यावर उत्तर देण्यासाठी साक्षी महाराज यांना बुधवारी सकाळपर्यंतचा वेळ निवडणूक आयोगाने दिला आहे.

साक्षी महाराजांनी धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्याविरोधात मेरठ पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानेही त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जात आणि धर्माच्या नावाखाली राजकीय पक्ष व नेत्यांना मते मागता येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता.

४ जानेवारी रोजी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील उन्ना येथील खासदार साक्षी महाराज यांनी वाह्यात वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य समाजात शत्रुत्व आणि दुफळी निर्माण करणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

दरम्यान, या नोटिशीला उत्तर देण्यास आपण बांधील नसल्याचे सांगत मी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केले नसल्याचे साक्षी महाराज यांचे म्हणणे आहे. माझे वक्तव्य एका विशिष्ट समाजासाठी असल्याचा विपर्यास का केला जात आहे, असा उलट सवालही त्यांनी केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version