Home महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन राज्याबाहेरच

मराठी साहित्य संमेलन राज्याबाहेरच

0

गणेशोत्सव संपल्यानंतर आता भाषेचा उत्सव कुठे होणार, याकडे राज्यातील साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


पुणे – गणेशोत्सव संपल्यानंतर आता भाषेचा उत्सव कुठे होणार, याकडे राज्यातील साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्ली आणि बडोदा या नावाला पसंती दिली जात आहे. पूर्वी दिल्लीच्या पर्यायासाठी असलेला जोर आता बडोद्यासाठी लावण्यात येत आहे. चार ठिकाणे मागे पडल्याने मुख्य स्पर्धा दिल्ली आणि बडोदा या दोन शहरांमध्येच असून, आगामी साहित्य संमेलन हे राज्याबाहेरच होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. १० सप्टेंबर रोजी संमेलनस्थळ जाहीर होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे ९१ व्या साहित्य संमेलनासाठी सहा ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अमरावती या दोन ठिकाणांसाठी पाठवलेले निमंत्रण मागे पडले आहे. नागपूरच्या कल्याण शिक्षण संस्थेकडून चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी या स्थळासाठी निमंत्रण पाठवण्यात आले होते; पण या नावावरही फुली मारण्यात आली आहे. विशेष म्हणजे संमेलन भरविणा-या  साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाकडेच आहे.

[EPSB]

भरदिवसा रेल्वे स्थानकावर चिमुरड्याचे अपहरण

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकावरून एका चिमुरड्याचे अपहरण झाले असून ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version