Home महामुंबई मुंबईतील सागरी किनारा मार्ग दृष्टिपथात

मुंबईतील सागरी किनारा मार्ग दृष्टिपथात

0

मुंबईमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेतर्फे राबवला जाणारा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे (कोस्टल रोड) काम अखेर नव्या वर्षांत मुंबईकरांच्या दृष्टिपथात येण्याची शक्यता आहे.

मुंबई- मुंबईमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेतर्फे राबवला जाणारा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे (कोस्टल रोड) काम अखेर नव्या वर्षांत मुंबईकरांच्या दृष्टिपथात येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या विविध कामांसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात नरिमन पॉइंट येथील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी या मागार्चे काम हाती घेतले जाणार आहे.

मुंबईमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. वाढती वाहन संख्या, रस्त्यांची मयार्दा अशी विविध कारणे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान सागरी किनारा मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबरअखेपयर्ंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा प्रशासनाचा मानस असून नव्या वर्षांमध्ये कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी प्रशासनाने गेल्या आठवडय़ात विविध कंपन्यांसाठी निविदा प्रक्रिया पूर्व बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विविध कंपन्यांचे १७ प्रतिनिधी सहभागी होते. या प्रकल्पाच्या कामाबाबत करण्यात येणारे कंत्राट, तंत्रज्ञान, वस्तू आणि सेवा कर आदी विविध विषयांबाबत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शंका उपस्थित केल्या होत्या. वरिष्ठ पालिका अधिका-यांनी या शंकांचे निरसन केले.

पुढील वर्षी कामाला सुरुवात
पहिल्या टप्प्यात प्रियदर्शनी पार्क ते हाजी अली, दुस-या टप्प्यात हाजी अली ते वरळी, तिस-या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क (बोगदा) कामांसाठी निविदा काढण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ३१ ऑक्टोबर रोजी निविदा सादर करण्याची अंतिम तारीख असून कंत्राटदारांनी सादर केलेली आर्थिक निविदा ४ डिसेंबर रोजी उघडण्यात येणार आहे. त्यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती करून त्यांना कायार्देश देण्यात येणार आहे. डिसेंबर अखेपयर्ंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राटदारांची नियुक्ती होईल आणि नव्या वर्षांत सागरी किनारा मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी अपेक्षा पालिकेतील वरिष्ठ अधिका-यांनी व्यक्त केली आहे.

[EPSB]

जागर लिंगभेद संवेदीकरणाचा

ज्युबिलियंट भारतीय फाऊंडेशनच्यावतीने सोशल इंटरप्रिन्यूयर ऑफ द इयर २०१७ या पुरस्काराकरिता भारतातून मुंबईच्या एज्युकेट गर्ल्स सामाजिक संस्थेच्या सफिना हुसैन या सामाजिक कार्यकर्तीची निवड करण्यात आली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version