Home टॉप स्टोरी राज्यसभेत सचिन तेंडुलकर उपस्थित

राज्यसभेत सचिन तेंडुलकर उपस्थित

0

राज्यसभा खासदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर गुरूवारी राज्यसभेच्या सभागृहात उपस्थित राहिला होता.

नवी दिल्ली- राज्यसभा खासदार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर गुरूवारी राज्यसभेच्या सभागृहात उपस्थित राहिला होता. समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी दोन दिवसांपुर्वी सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्या गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित केला होता.

सचिन आणि रेखा यांना राज्यसभेत यायचे नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी दोन दिवसांपुर्वी केली होती. नरेश आग्रवाल यांनी मार्च महिन्यातही हा मुद्दा उपस्थित केला होता. या दोघांकडे जाहिराती करायला वेळ आहे, इतर ठिकाणी जायला वेळ आहे, मग राज्यसभेत यायला वेळ का नाही? असाही सवाल त्यांनी विचारला होता.

कला आणि क्रीडा या विभागातून नामवंत व्यक्तींना खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवले जाते मात्र रेखा आणि सचिन तेंडुलकर यांनी मागील तिन्ही अधिवेशनात हजेरी लावली नाही. ते फार कमी वेळा राज्यसभेत आले आहेत.

२०१२ मध्ये रेखा आणि सचिन तेंडुलकरची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास ३४८ दिवसांपैकी सचिनने २३ तर रेखाने केवळ १८ दिवस सदनात हजेरी लावली. पावसाळी अधिवेशनातही दोघांनी उपस्थिती लावली नाही. गेल्या बजेट सेशनमध्ये (३१ जानेवारी २०१७ ते ९ फेब्रुवारी २०१७) दोघांनी केवळ एक-एक दिवस हजेरी लावली.

सचिन, रेखाला राज्यसभेत यायला वेळ नाही का?

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version