Home विदेश रोजगार निर्मितीत सरकारला अपयश-राहुल गांधी

रोजगार निर्मितीत सरकारला अपयश-राहुल गांधी

0
India's ruling Congress party General Secretary Rahul Gandhi gestures as he speaks to the press outside his residence in New Delhi on March 6, 2012. Rahul Gandhi, the Congress party politician seen as India's prime-minister-in-waiting, accepted responsibility for poor results in state elections in which he had led campaigning. AFP PHOTO/ SAJJAD HUSSAIN (Photo credit should read SAJJAD HUSSAIN/AFP/Getty Images)

असहिष्णुता आणि वाढती बेकारी हीच भारतासमोरील प्रमुख आव्हाने आहेत यामुळेच भारताची सुरक्षा आणि विकास प्रक्रीया अडचणीत आली असल्याचे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. ते सध्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत.

वॉशिंग्टन- असहिष्णुता आणि वाढती बेकारी हीच भारतासमोरील प्रमुख आव्हाने आहेत यामुळेच भारताची सुरक्षा आणि विकास प्रक्रीया अडचणीत आली असल्याचे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. ते सध्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत.  पुढे बोलताना ते म्हणाले की, एकूण जगभरातच सध्याच्या काळात सहिष्णुता धोक्यात आली आहे. मात्र भारतातील असहिष्णुतेचे प्रमाण अधिक गंभीर आहे. त्याचप्रमाणे देशात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असलेल्या तरुणाईच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी रोजगार निर्माण करण्यात सरकारला अपयश आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे देशात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे देश भयानक विघातक दिशेने वाटचाल करीत आहे; अशी भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली.

डेमोक्रॅटिक पक्षाचा थिंक टँक समजल्या जाणा-या सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसने आयोजित केलेल्या अमेरिका स्थित भारतीय, दक्षिण आशियाई तज्ञांबरोबरच्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते. राहुल गांधींच्या भाषणानंतर उपस्थित त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाल्याचा दावा काँग्रेसच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी केला. राहुल यांची जी प्रतिमा आमच्या मनात होती; प्रत्यक्षात ते अतिशय वेगळे आहेत. ते तर्कशुद्ध विचार करणारे, अभ्यासू आहेत. त्यांना समस्यांची जाण आहे; असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा उत्तम प्रवक्ते आहेत अशी कबुली काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कले येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांंना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यापेक्षा चांगले प्रवक्ते असल्याचं मान्य केले. मात्र, स्तुती करण्याच्या बहाण्याने त्यांनी मोदींवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. ‘पंतप्रधान मोदींकडे काही कौशल्य आहेत. नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम प्रवक्ते आहेत’, असं राहुल गांधी सुरुवातीला बोलले. ‘गर्दीतील तीन ते चार वेगवेगळ्या गटांपर्यंत आपला संदेश कसा पोहोचवायचा हे मोदींना चांगलंच माहिती आहे. आपला संदेश पोहोचवण्याची त्यांची क्षमता प्रभावी आणि जटिल आहे’, असं राहुल गांधी बोलले. नंतर पुढे बोलताना त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली.

[EPSB]

कोकणात रात्रीपासून वादळी वा-यासह पडणा-या मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version