Home क्रीडा आरएफवायएस फुटबॉल स्पर्धेच्या अहमदाबाद लेगला सुरुवात

आरएफवायएस फुटबॉल स्पर्धेच्या अहमदाबाद लेगला सुरुवात

0

नीता अंबानी यांनी यावेळी भारताच्या १७ वर्षाखालील वर्ल्डकप संघाला शुभेच्छा दिल्या. ‘‘भारतीय फुटबॉलसाठी सध्या चांगले दिवस आहेत.

नीता अंबानी यांनी यावेळी भारताच्या १७ वर्षाखालील वर्ल्डकप संघाला शुभेच्छा दिल्या. ‘‘भारतीय फुटबॉलसाठी सध्या चांगले दिवस आहेत. पुरुष संघाने फिफा क्रमवारीमध्ये अव्वल १०० संघात स्थान मिळवले. तब्बल दोन दशकांनंतर भारताला अशी करामत साधता आली. भारताच्या फुटबॉल इतिहासात प्रथमच फिफा १७ वर्षाखालील वर्ल्डकप आयोजनाची संधी मिळत आहे.

घरच्या मैदानावरील आपले फुटबॉलपटू सवरेत्कृष्ट खेळ करून देशाचे नाव उंचावतील,’’ असे अंबानी म्हणाल्या.रिलायन्स फाउंडेशन युथ स्पोर्ट्स स्कूलच्या (आरएफवायएस) आणि कॉलेज फुटबॉल स्पर्धेच्या अहमदाबाद लेगला शुक्रवारी सुरुवात झाली. फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांच्या हस्ते लेगचे उद्घाटन झाले.

[EPSB]

ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाचवी आणि अंतिम वनडे रविवारी (१ ऑक्टोबर) विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) जामठा स्टेडियमवर खेळली जात आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version