Home महामुंबई पुनर्विकासाचे काम झाले नसल्यास ना हरकत प्रमाणपत्र रद्द

पुनर्विकासाचे काम झाले नसल्यास ना हरकत प्रमाणपत्र रद्द

0

म्हाडाच्या ५६ वसाहतींमधील जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे, मात्र पुनर्विकासाचे एक टक्काही काम झालेले नसल्यास संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेला दिलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ रद्द करण्याच्या सूचना म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी दिल्या आहेत.

मुंबई- म्हाडाच्या ५६ वसाहतींमधील जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे, मात्र पुनर्विकासाचे एक टक्काही काम झालेले नसल्यास संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेला दिलेले ‘ना हरकत प्रमाणपत्र’ रद्द करण्याच्या सूचना म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी दिल्या आहेत.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडाशी संबंधित विविध विषयांबाबत आढावा घेण्यासाठी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी बैठकीचे आयोजन केले होते. म्हाडा अखत्यारीतील मुंबई शहरातील धोकादायक उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्वकिास अधिक वेगाने होण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांच्या समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन कायद्यात बदल-सुधारणा करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करावा, उपकरप्राप्त धोकादायक इमारती त्वरित रिकाम्या करण्याचा प्रयत्न करावा, भाडेकरूंनी अडथळे आणल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, आठ संक्रमण शिबिरांच्या पुनर्वकिासास गती देऊन येत्या डिसेंबरअखेपयर्ंत संक्रमण शिबिरांचा प्रश्न मार्गी लावावा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे असलेल्या सदनिका म्हाडाला संक्रमण गाळे म्हणून देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, उपकरप्राप्त इमारतींमध्ये राहणा-या घुसखोरांबाबत निश्चित धोरण तयार करून प्रस्ताव सादर करावा आदी सूचना मेहता यांनी केल्या.

म्हाडा वसाहतींमधील जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्वकिासासाठी विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अन्वये शासनाने २०१३ च्या अधिसूचनेमध्ये फेरबदलाची अधिसुचना ३ जुलै २०१७ रोजी जारी केली. या फेरबदलाच्या अधिसूचनेनंतर सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींच्या पुनर्वकिासाचे प्रस्ताव म्हाडाकडे सादर केले आहेत. या सर्व प्रस्तावांची छाननी करून त्यांना देकार पत्र देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी. तसेच म्हाडा वसाहतींमधील जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्वकिासासाठी म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आदेश मेहता यांनी दिले.

[EPSB]

भारनियमनामुळे नागरिकांचा संताप

सत्तारूढ झाल्याचा तिसरा वर्धापनदिन साजरा करण्याच्या तयारीत असतानाच वीज भारनियमनावरून भाजपला जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची पाळी आली आहे

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version