Home महामुंबई रायन शाळेविरोधात पालक एकवटले

रायन शाळेविरोधात पालक एकवटले

0

गुरगावमधील रायन इंटरनॅशनल शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये शुक्रवारी दुसरीत शिकणा-या प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर नालासोपारा पश्चिमेकडील रायन इंटरनॅशनल शाळेच्या पालकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली 

नालासोपारा- गुरगावमधील रायन इंटरनॅशनल शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये शुक्रवारी दुसरीत शिकणा-या प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर नालासोपारा पश्चिमेकडील रायन इंटरनॅशनल शाळेच्या पालकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आणि या शाळेत असे प्रकार होणार नाहीत यासाठी सुरक्षेत वाढ करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे पालकांनी केली आहे. नालासोपारा पश्चिमेकडील रायन इंटरनॅशनल शाळेच्या पालकांनी शाळेत धाव घेवून शाळा प्रशासनाला शनिवारी जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शाळा प्रशासनाने पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली व नालासोपारा पोलिसांना बोलावून पालकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्रकारांना आत जाण्यापासून मज्जाव केला होता.

सोमवारी शेकडो पालकांनी प्रद्युम्न ठाकूरला मेणबत्ती लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शेकडो पालकांनी सह्यांचे निवेदन दिले व आम्हाला तुकडीप्रमाणे सभा नको तर शाळेतील सर्व पालकांची एकत्र मिटिंग घ्या असे सांगितले. आम्ही शाळेत मुलांना शिकण्यासाठी पाठवतो. त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे. लाईट, पाणी, जनरेटरची सुविधा दिली पाहिजे, असे पालकांनी सांगितले. रायन इंटरनॅशनल शाळेत ईल चाळे, हत्येसारखे असे ४ प्रकार आधी घडल्याचे पालक सांगत असून या शाळेत जे कर्मचारी आहेत त्याच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बघून कामाला ठेवावे.  दरम्यान, रायन इंटरनॅशनल शाळेच्या प्रशासनाचे सुपरवायझर मनोज देवरुखकर यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

[EPSB]

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version