Home टॉप स्टोरी शिवसेना फुटणार

शिवसेना फुटणार

0

सत्तेमध्ये राहून वारंवार सरकारला अडचणीत आणणा-या शिवसेनेने पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला तर तीन ते चार मंत्री आणि २० ते २२ आमदार शिवसेना सोडून भाजपामध्ये जातील, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला.
मुंबई- सत्तेमध्ये राहून वारंवार सरकारला अडचणीत आणणा-या शिवसेनेने पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला तर तीन ते चार मंत्री आणि २० ते २२ आमदार शिवसेना सोडून भाजपामध्ये जातील. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला कोणताही धोका नाही, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यास त्यांचेच मोठे नुकसान होईल, असेही राणा म्हणाले.

शिवसेना सत्तेत असून वारंवार सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्तेत राहून शिवसेनेचे पक्ष प्रमुख रोज भाजपावर टीका करतात, ‘सामना’मधून वारंवार टीका केली जाते. अलिकडेच ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीनंतरही शिवसेना पाठिंबा काढून घेणार असल्याची आवई उठविण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना अपक्ष आमदार राणा म्हणाले की, शिवसेनेने दसरा मेळाव्यात पाठिंबा काढण्याची घोषणा केली, तरी काही फरक पडणार नाही. कारण आम्ही अपक्ष ६ आमदार देवेंद्र फडणवीसांच्या कामाबाबत सकारात्मक आहोत. इतकेच नाही तर शिवसेनेने पाठिंबा काढला तर त्यांचे २० ते २२ आमदार आणि ३ ते ४ मंत्री ‘मातोश्री’ ऐवजी ‘वर्षा’ बंगल्यावर दिसतील. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तरी, सरकार अजिबात अल्पमतात येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

शरद पवारही पाठिंबा देतील

शरद पवार यांचा नागरी सत्कार प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. जिकडे- जिकडे सत्कार होईल तिकडे तिकडे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे काम सकारात्मक आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवारही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला.

दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनीही शरद पवार हे भाजपाचे सरकार तारतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version