Home देश अल्पवयीन पत्नीसोबत संबंध म्हणजे बलात्कार

अल्पवयीन पत्नीसोबत संबंध म्हणजे बलात्कार

0

१८ वर्षाखालील अर्थात अल्पवयीन पत्नीसोबतचे शारीरिक संबंध म्हणजे बलात्कारच, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

नवी दिल्ली- १८ वर्षाखालील अर्थात अल्पवयीन पत्नीसोबतचे शारीरिक संबंध म्हणजे बलात्कारच, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालामुळे यापुढे अल्पवयीन पत्नीसोबतचे शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार समजला जाईल. यासोबतच सज्ञान व्यक्तीसाठीची १८ वर्षाची मर्यादा कमी केली जाऊ शकत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. पतीने १५ ते १८ वर्षाच्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवल्यास तो बलात्कार समजण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात नमूद केले.

सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठीचे वय कमी केले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. अल्पवयीन मुलीसोबत तिच्या पतीने शारीरिक संबंध ठेवल्यास तिला याबद्दलची तक्रार वर्षभरात दाखल करावी लागेल. न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देताना बालविवाहाच्या प्रथेबद्दल चिंता व्यक्त केली. ह्यसामाजिक न्यायासंबंधीचे कायदे ज्या भावनेने तयार केले जातात, त्या भावनेने ते लागू केले जात नाहीत, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने नाराजी प्रकट केली.

भारतीय दंड विधानातील कलम ३७५ चा अपवाद कायम राखायला हवा. यामुळे पतीला संरक्षण मिळते. बाल विवाह प्रकरणांमध्ये असे संरक्षण आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. भारतीय दंड विधानातील हे कलम रद्द करू नये, असे आवाहन केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आले होते. संसदेला याबद्दल विचार करण्यासाठी निश्चित कालावधी दिला जावा, अशीही मागणी केंद्राकडून करण्यात आली होती.

बाल विवाह हे समाजातील वास्तव आहे आणि याबद्दल कायदा तयार करणे, हे संसदेचे कर्तव्य आहे, असे केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असेही केंद्र सरकारने म्हटले होते. सती प्रथादेथील कित्येक शतकांपासून सुरू होती. मात्र, तीदेखील संपवण्यात आली. त्यामुळे कित्येक काही प्रथा वर्षांपासून सुरू आहेत, म्हणून एखादी प्रथा योग्य ठरत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निकाल सुनावताना म्हटले.

[EPSB]

‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ अशी म्हण असणारी आणि त्याचा सर्वानाच प्रत्यय देणारी दिवाळी आता अगदी तोंडावर आली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version