Home देश राम मंदिरासंदर्भात सुब्रमण्यम स्वामी घेणार आदित्यनाथांची भेट

राम मंदिरासंदर्भात सुब्रमण्यम स्वामी घेणार आदित्यनाथांची भेट

0

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारणी संदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. 

नवी दिल्ली- अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारणी संदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. ही अनौपचारिक बैठक असल्याची माहिती स्वामी यांनी दिली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी म्हणाले, ही अनौपचारिक भेट आहे. ते मला ओळखतात आणि त्यांचे गुरूही माझ्या चांगल्या परिचयाचे होते. आम्ही दोघेही हिंदुत्वाचे भागीदार आहोत. त्यांनी मला लखनऊला भेटायला येण्यास सांगितले आहे. मी नक्कीच राम मंदिराबाबत चर्चा करणार आहे.

मात्र ही बैठक अनौपचारिक आहे. आदित्यनाथ हे करारी व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगत त्यांनी आश्वासन दिले असेल, तर ते नक्कीच पाळतील, असा विश्वास स्वामी यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर प्रकरण संवेदनशील असल्याने दोन्ही पक्षांनी परस्पर चर्चेने प्रश्न सोडविण्याबाबत सुचविले आहे.

न्यायालयाच्या सूचनेचे स्वामी यांनी स्वागत केले आहे. दरम्यान, मागील आठवड्यात राम मंदिर प्रकरणाची सुनावणी तातडीने घेण्याबाबत स्वामी यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version