Home देश ‘राम रहीमला विरोध करणा-यांना संपवून टाकू’

‘राम रहीमला विरोध करणा-यांना संपवून टाकू’

0

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला बलात्काराच्या गुन्ह्याखाली २० वर्षांची शिक्षा झाली आहे. मात्र राम रहीमला शिक्षा ठोठावल्यानंतरही त्याच्या अनुयायांची मग्रुरी कायम आहे.

पंचकुला- डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला बलात्काराच्या गुन्ह्याखाली २० वर्षांची शिक्षा झाली आहे. मात्र राम रहीमला शिक्षा ठोठावल्यानंतरही त्याच्या अनुयायांची मग्रुरी कायम आहे. डेरा सच्चा सौदाच्या ‘कुर्बानी आघाडी’ने पत्रकार, हरयाणातील पोलीस अधिकारी आणि डेरा सच्चा सौदाच्या माजी अनुयायांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ‘राम रहीम यांच्याविरोधात बोलणा-या सर्वांना आम्ही संपवू,’ अशी धमकी ‘कुर्बानी आघाडी’कडून पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

डेरा सच्चा सौदाच्या ‘कुर्बानी आघाडी’च्या पत्रांमध्ये काही वृत्तवाहिन्यांच्या नावांचा समावेश आहे. केंरदातील आणि हरयाणातील भाजप सरकारने राम रहीम यांची फसवणूक केल्याचा आरोपही या पत्रातून करण्यात आला आहे. ‘डेरातील किमान २०० मुले राम रहीम यांच्यासाठी प्राणांची बाजी लावायला तयार आहेत.

राम रहीम यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या, त्यांच्या विरोधात बोलणा-या सर्वाना धडा शिकवला जाईल. याचा बदला डे-यातील २०० मुलांकडून घेतला जाईल,’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. चंदिगढमध्ये असलेल्या अनेक प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांना डेरा सच्चा सौदाकडून टपालाने धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे.

याआधी डेरा सच्चा सौदाने त्यांच्या मुखपत्रातून अनुयायांना भडकावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर आता थेट प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना, हरयाणा पोलीस विभागातील अधिका-यांना जीवे मारण्याची धमकी डेरा सच्चा सौदाकडून देण्यात आली आहे. या पत्राची सत्यता पडताळून पाहण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. राम रहीम सध्या रोहतकमधील तुरुंगात आहे. तर त्याची मानलेली मुलगी हनीप्रीतचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
२५ ऑगस्टला राम रहीमला बलात्कार प्रकरणात २० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर पंचकुलासह हरयाणातील अनेक भागांमध्ये हिंसाचार उसळला होता. राम रहीमच्या अनुयायांनी केलेल्या हिंसाचारात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान डेरा सच्चा सौदाच्या मालकीच्या संपत्तीतून वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

[EPSB]

माणसाचे जीवन हे क्षणभंगूर आहेच, पण मुंबईकरांचे जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version