Home महामुंबई रेल्वे कर्मचा-यांना क्लीनचिट

रेल्वे कर्मचा-यांना क्लीनचिट

0

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांचा तपास अहवाल समोर आला आहे.

मुंबई- एलफिन्स्टन चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांचा तपास अहवाल समोर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी आपल्या तपासात जीआरपी, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन कर्मचारी स्टाफला क्लीनचिट दिली आहे. दादर पोलिसांनी आपल्या चौकशी अहवालात, एलफिन्स्टन चेंगराचेंगरीसाठी पिक अवरला झालेली अतिगर्दी आणि अचानक आलेला पाऊस कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

आम्ही जवळपास निष्कर्षापर्यंत  पोहोचलो आहोत. या चेंगराचेंगरीचे मुख्य कारण म्हणजे पाऊस आणि अचानक वाढलेली गर्दी आहे. एकाचवेळी चार लोकल स्टेशन परिसरात आल्या. त्या लोकलमधून प्रवासी आल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. चौकशीदरम्यान आम्ही स्टेशन मास्तरांकडून त्या दिवशीची रेल्वेची माहिती आणि एलफिन्स्टन-परळ स्टेशनवर किती प्रवासी उतरले याची माहिती घेतली.

इतकेच नाही तर आम्ही हवामान विभाग आणि मुंबई महापालिकेकडेही त्यादिवशी १०.२६ वा पाऊस पडला होता, याची माहिती मागवली आहे. त्यामुळे पाऊस पडत होता हा आमचा दावा खरा ठरेल, असे दादर पोलिसांनी सांगितले. एलफिन्स्टन चेंगराचेंगरीला आठ दिवस उलटले आहेत. २९ सप्टेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला. परळ आणि एलफिन्स्ट स्टेशन्सना जोडणा-या फूटओव्हर ब्रीजवर चेंगराचेंगरी झाली होती.

या प्रकरणाची चौकशी दादर पोलीस करत आहेत. पोलिसांनी चौकशीदरम्यान रेल्वे पोलीस, जीआरपी आणि रेल्वे स्टाफ-स्टेशन मास्तर किंवा तिकीट बुकिंग स्टाफ या कोणालाही जबाबदार धरलेलं नाही. तर चेंगराचेंगरीसाठी पिक अवरला झालेली अतिगर्दी आणि अचानक आलेला पाऊस कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी ३९ जखमींसह जवळपास ७० जणांची जबाब घेऊन हा निष्कर्ष काढला. यादरम्यान पोलिसांनी त्या दिवशी डय़ुटीवर असलेले स्टेशन मास्तर अनिल गुप्ता, आरपीएफ कॉन्स्टेबल, तिकीट क्लार्क यांचेही जबाब नोंदवले. ज्या कॉन्स्टेबलने सर्वात आधी चेंगराचेंगरीची माहिती स्टेशन मास्तरांना दिली होती, त्यांचा जबाब घेण्यात आला.

[EPSB]

झिरो पेंडन्सी राज्यभर लागू करणार : मुख्यमंत्री

पुण्याचा प्रशासकीय कारभार उत्तम पद्धतीने सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कारभाराची गती उत्तम आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version