Home महाराष्ट्र रायगडात पावसाने सरासरी गाठली

रायगडात पावसाने सरासरी गाठली

0

रायगड जिल्ह्यात यंदा पावसाने सप्टेंबर महिन्यातच सरासरी गाठली आहे. रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ३ हजार १४२ मिलीमीटर इतके आहे.

अलिबाग- रायगड जिल्ह्यात यंदा पावसाने सप्टेंबर महिन्यातच सरासरी गाठली आहे. रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ३ हजार १४२ मिलीमीटर इतके आहे. यंदाच्या मोसमात आजपर्यंत ३१ हजार ८८ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. पावसाची सरासरी १००.०४ इतकी आहे. जून, जुलै या दोन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. पेण तालुक्यात सर्वाधिक १३४.६१ मिमीच्या सरासरीने पाऊस पडला आहे.

यंदाच्या मोसमात जून महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाने चांगली हजेरी लावली होती. जूनच्या पहिल्या आठवडय़ात हुलकावणी देणारा पाऊस जूनच्या दुस-या आठवडय़ापासून दमदार बरसायला लागला. त्यानंतर पावसाने सात्यत्य राखले. जूनमध्ये सरासरी १०६. ४६ मिमी इतका पाऊस झाला तर जुलैमध्येही सरासरी ११५.६४ इतक्या पावसाची नोंद झाली. ऑगस्टमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९९.२५ टक्के इतका झाला असला तरी सप्टेंबरमध्ये त्याची कसर भरून काढली आहे. सप्टेंबर महिन्याचे पर्जन्यमान १३.८४ टक्के इतके असले तरी यंदा १२ सप्टेंबपर्यंत २३.२५ टक्के इतका पाऊस बरसला आहे.

अलिबाग, पेण, उरण, कर्जत, माथेरान येथे सरासरीपेक्षा जास्त पऊस पडला आहे. पुन्हा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उर्वरीत तालुक्यांमध्ये देखील यंदा पाऊस सरासरी गाठेल. यंदा पाऊस समाधानकारक आहे. शेतीला पूरक असा पाऊस पडला आहे. त्यामुळे यावर्षी भाताचे पीक चांगले येईल असा अंदाज आहे. काही ठिकाणी आताच लोंब्या दिसू लागल्या आहेत. गरव्या जातीची पिके पोटरीमध्ये दाणा भरण्याच्या अवस्थेत आहेत. धरणक्षेत्रातदेखील यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. परिणामी उन्हाळय़ात पाणीटंचाई कमी जाणवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

[EPSB]

जर्मनीत अश्रुधुराच्या हल्ल्यात सहा जखमी

जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर अश्रूधुराचा हल्ला झाल्याचे वृत्त आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version