Home महामुंबई ठाणे रायगड जिल्ह्यात नगरसेवकपदाच्या १७० जागांसाठी ८७१ उमेदवारी अर्ज दाखल

रायगड जिल्ह्यात नगरसेवकपदाच्या १७० जागांसाठी ८७१ उमेदवारी अर्ज दाखल

0

रायगड जिल्ह्यातील९ नगरपालिकांच्या नगरसेवकपदाच्या १७० जागांसाठी ८७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

अलिबाग- रायगड जिल्ह्यातील९ नगरपालिकांच्या नगरसेवकपदाच्या १७० जागांसाठी ८७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदाच्या नऊ जागांसाठी ६८ अर्ज दाखल झाले आहेत.

रायगड जिल्ह्यातील ९ नगरपालिकांच्या निवडणुका २७ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. त्यासाठी २४ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. २४ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत नगरसेवकपदाच्या १७० जागांसाठी ८७१ अर्ज आले.

नगराध्यक्षपदाच्या ९ जागांसाठी ६८ अर्ज दाखल झाले. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांबरोबच, डमी, बंडखोर तसेच अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. २ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होईल. ११ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version