Home महाराष्ट्र रायगडात ६१ सरपंच, तर ५४ ग्रामपंचायती बिनविरोध

रायगडात ६१ सरपंच, तर ५४ ग्रामपंचायती बिनविरोध

0

रायगड जिल्ह्यात दुस-या टप्प्यातील २४२ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया १६ ऑक्टोबरला होत आहे. ५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती.

अलिबाग- रायगड जिल्ह्यात दुस-या टप्प्यातील २४२ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया १६ ऑक्टोबरला होत आहे. ५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. त्यानुसार जिल्ह्यातील २४२ पैकी ६१ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवड बिनविरोध झाली असून ५४ ग्रामपंचायती पूर्णत: सरपंच व सदस्यासह बिनविरोध झाल्या आहेत. त्याचबरोबर २४२ ग्रामपंचायतीमध्ये ६३८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सरपंच पदाच्या १७४ जागासाठी ४५४ तर सदस्यपदाच्या १२८० जागासाठी २६५७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

रायगड जिल्ह्यात २४२ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यावेळी सरपंचपदाची निवडणूक थेट मतदारांमधून करण्यात येणार आहे. २४२ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी ८२७ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. छाननी मध्ये ५ अर्ज बाद झाले होते तर ५ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी २९७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्याचबरोबर ६१ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाची निवड बिनविरोध झाली असून १७४ सरपंच पदासाठी ४५४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर ७ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. जिल्ह्यातील महाड तालुक्यात सर्वाधिक २७ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडही बिनविरोध झाली असून पेण ४, उरण १, खालापूर १, माणगाव ८, तळा १, रोहा १, सुधागड २, श्रीवर्धन ६, पोलादपूर ७, म्हसळा ३ असे एकूण ६१ सरपंचाची निवड बिनविरोध झाली आहे.
जिल्ह्यात २४२ ग्रामपंचायतींमध्ये ७६० प्रभागामध्ये १९५६ सदस्य संख्येसाठी ४२८८ नामनिर्देशन अर्ज दाखल झाली होती. यामध्ये ९५१ सदस्यांनी माघार घेतली असून ६३८ ठिकाणी बिनविरोध सदस्य निवडून आलेले आहेत.

७६० प्रभागापैकी २९८ प्रभाग बिनविरोध झालेले आहेत तर २ प्रभाग पूर्णत: रिक्त राहिलेले आहेत त्यामुळे ५१५ प्रभागामध्ये निवडणूक होणार आहे. २४२ ग्रामपंचायतींमध्ये १९५६ सदस्यांपैकी ६१ सदस्याच्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. २४२ ग्रामपंचायतीमध्ये ५४ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या असून १८८ ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती पहावयास मिळणार आहेत. त्यामुळे १२८० सदस्याच्या जागासाठी २६५७ उमेदवार रिंगणात उभे राहिलेले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळी सरपंच निवड ही थेट मतदारांमधून होणार असल्याने गावपातळीवर राजकीय पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी सरळ तर काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढत पाहण्यास मिळणार आहेत.

बिनविरोध ग्रामपंचायती
पेण २६ पैकी ४, मुरुड ६ पैकी १, पनवेल ११ पैकी १, खालापूर १४ पैकी २, माणगाव १९ पैकी ४, सुधागड १४ पैकी १, महाड ७३ पैकी २६, श्रीवर्धन १४ पैकी ७, पोलादपूर १६ पैकी ६, म्हसळा १३ पैकी २.

[EPSB]

आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातील ५४ हजार पेट्रोल पंप चालकांनी दि. १३ ऑक्टोबर रोजी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version