Home देश राहुल गांधी २०१९ मध्ये पंतप्रधान होतील : वीरप्पा मोईली

राहुल गांधी २०१९ मध्ये पंतप्रधान होतील : वीरप्पा मोईली

0

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील आणि त्यानंतर होणा-या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला विजयी करून पंतप्रधान होतील, असे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी वर्तविले आहे.

हैद्राबाद- हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील आणि त्यानंतर होणा-या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला विजयी करून पंतप्रधान होतील, असे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी वर्तविले आहे. ते शुक्रवारी हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गुजरातमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसला राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली चांगला विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त करून मोईली पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष लवकरच पश्चिमेकडील राज्यांमध्ये सत्ता प्रस्थापित करेल. राहुल गांधींनी गुजरातमध्ये गांभीर्याने लक्ष घातले असून ते खूप मेहनतीने दौरे करत आहेत. त्यांच्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांंना नवा हुरूप आला आहे, असे मोईली यांनी सांगितले.

मात्र, यावेळी मोईली यांनी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद कधी स्वीकारणार, याबाबत स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. राहुल यांच्या अध्यक्षपदाच्या राज्यभिषेकाबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, त्याबद्दल आत्ताच ठोस काही सांगता येणार नाही.

या सगळ्याची एक प्रक्रिया असते, असे मोईली यांनी म्हटले. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात विलंब होतो आहे, असे पक्षातील प्रत्येकालाच वाटत आहे. परंतु, ते सध्या संघटनात्मक निवडणुकांची वाट पाहत आहेत. या निवडणुकांच्या माध्यमातूनच त्यांना अध्यक्षपदी निवडून यायचे आहे, असे मोईली यांनी सांगितले.

[EPSB]

भारतीय नागरिकांची युनिक ओळख असलेल्या ‘आधार’ कार्डने केंद्र सरकारच्या तिजोरीलाही भक्कम आर्थिक आधार दिल्याचे समोर आले आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version