Home देश राहुल गांधींनी त्या वक्तव्याबाबत माफी मागावी : आनंदीबेन पटेल

राहुल गांधींनी त्या वक्तव्याबाबत माफी मागावी : आनंदीबेन पटेल

0

राहुल गांधी यांनी स्त्रियांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत काँग्रेस पक्षाने महिलांची माफी मागावी, अशी मागणी गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केली आहे.

नवी दिल्ली- राहुल गांधी यांनी स्त्रियांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत काँग्रेस पक्षाने महिलांची माफी मागावी, अशी मागणी गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये गुजरातमधील महिला तोकडय़ा कपडय़ात जातात, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा आनंदीबेन यांनी केला असून यावरून त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, महिलांकडे बघत राहणे हीच काँग्रेसची दृष्टी आहे का? त्यांनी कुठले कपडे घातले आहेत याकडे तुमचे लक्ष का? राहुल गांधींनी तातडीने आपले शब्द मागे घ्यावेत आणि गुजराती महिलांची माफी मागावी अन्यथा महिला एकत्र आल्या तर त्यांना निवडणूक लढवणेही मुश्किल होईल.

आनंदीबेन म्हणाल्या, काँग्रेसच्या महिला या राहुल यांना विचारून कपडे घालतात का? राहुल यांचे महिलांप्रतीचे हे वक्तव्य ठीक आहे का?, याचे उत्तर सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी द्यावे. त्यादेखील राहुल यांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाहीत, अशी टिप्पणीही त्यांनी केली. संघाच्या शाखांमध्ये महिला दिसत नाहीत, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, महिलांसाठी वेगळ्या शाखा आहेत. राहुल गांधी यांना याची माहितीच नाही की महिलांसाठी वेगळ्या शाखा आहेत. देशभरातील महिलांसाठीच्या लाखो शाखांमध्ये नित्यनियमाने महिला जातात आणि आपले काम करतात. गांधींना याची माहिती नसेल तर त्यांनी ती करून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

भाजपचे अमेठीत लक्ष्य
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये लक्ष केंद्रित केले असतानाच भाजपने त्यांना अमेठीत हादरा दिला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय जंग बहादूर सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. अमित शहा यांच्या अमेठी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जंग बहादूर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. अमेठी हा राहुल गांधी यांचा मतदारसंघ असून नुकताच त्यांनी मतदारसंघाचा दौराही केला होता. या दौऱ्यानंतर जंग बहादूर सिंह यांनी काँग्रेसला रामराम केला. जंग बहादूर सिंह हे काँग्रेसचे महासचिव होते. जंग बहादूर यांच्यासह अमेठीतील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

पक्षाच्या धोरणावर नाराज असल्याने मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला, असे सिंह यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींना आव्हान देणाऱ्या स्मृती इराणी यांनी सिंह यांची भेट घेतली. ‘राहुल गांधींचे विश्वासू साथीदार पक्ष सोडत आहे. यावरूनच पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये पक्षनेतृत्वाविषयीची नाराजी दिसते, असे इराणींनी सांगितले. जो व्यक्ती स्वत:च्या मतदारसंघाचा विकास करू शकत नाही, तो देशाचा विकास काय करणार असा सवाल त्यांनी विचारला. भाजप सरकारने सुरू केलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

[EPSB]

दिवाळी उत्सवात फटाक्यांची आतषबाजी करून हवेचे व ध्वनीचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत असते. याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची नितांत गरज आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version