Home टॉप स्टोरी पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले

पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले

0

उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले. 

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने बुधवारी बिगूल वाजवले. समाजवादी पक्ष, बसपा, भाजपा व काँग्रेसने आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावलेल्या उत्तर प्रदेशसाठी फेब्रुवारी ११ ते ८ मार्च अशा सात टप्प्यांत मतदान होणार असून पंजाब आणि गोव्यात एकाच दिवशी ४ फेब्रुवारीला मतदान होईल. उत्तराखंड १५ फेब्रुवारी आणि मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत ४ आणि ८ मार्च असे मतदान होणार आहे. या सर्व राज्यांतील निवडणुकांचा निकाल ११ मार्च रोजी एकत्रित जाहीर होणार आहे.

पाच राज्यांतील निवडणुकांचे हे वेळापत्रक मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले.

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात ४०३ मतदारसंघासाठी सात टप्प्यांत मतदानाचा भरगच्च कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. यामध्ये फेब्रुवारी ११, १५, १९, २३, २७ आणि ४ व ८ मार्च असे मतदानाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. या मतदान प्रकियेत १६ कोटी मतदारांचा सहभाग राहणार असून पाच राज्यांतील ६९० मतदारसंघांत मतदार राजाचा कौल घेतला जाणार आहे. या निवडणुकीसाठी आयोगाकडून १ कोटी ८५ लाख मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. २०१२च्या निवडणुकीपेक्षा या मतदान केंद्रांत १५ टक्के वाढ झाली आहे.

पंजाब व गोव्यासाठी ११ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार आहे. निवडणूक आयुक्त ए. के. जोती व ओ. पी. रावत याविषयीची लवकरच घोषणा करतील. या राज्यांत आचारसंहिता लागू झाल्याचे झैदी यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांना त्यांचे नवीन बँक खाते निवडणूक खर्च दाखवण्यासाठी उघडावे लागणार आहे. निवडणूक खर्च आणि इतर खर्च २० हजार रुपयांपेक्षा अधिकचा धनादेश देऊन करता येईल. निवडणूक काळात सर्व निधी धनादेशामार्फत स्वीकारावे लागणार आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड राज्यांतील प्रत्येक उमेदवारासाठी २८ लाख रुपये निवडणूक खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे. तीच मर्यादा गोवा आणि मणिपूरसाठी २० लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version